आता तुमचा विकेंड होणार आणखी मनोरंजक, कसं ते जाणून घ्या

 चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते सिनेमे आणि त्या वेब सीरीज जे तुमच्या विकेंडला चार चाँद लावतील...

Jul 29, 2022, 23:48 PM IST

Movie release this week : तुम्हालाही घरी बसून सिनेमा पाहण्याची आवड असेल तर जुलै महिन्याचा शेवटचा विकेंड तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. या आठवड्यात अनेक सिनेमे हे मोठ्या पडद्यावर रीलीज न होता ते OTT प्लॅटफॉर्म्सवर रीलीज होणार आहेत. त्यासोबतच, अनेक वेब सीरीज देखील या आठवड्यात रीलीज होत आहेत. हे सिनेमे आणि या वेब सीरीज तुमच्या विकेंडला आणखी आनंदी करतील यात काही शंकाच नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते सिनेमे आणि त्या वेब सीरीज जे तुमच्या विकेंडला चार चाँद लावतील...

1/5

Ek Villain Returns (Box Office)

2014 मध्ये सुपरहिट ठरलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'एक विलन' (Ek Villain). हा सिनेमा प्रेक्षकांना खुप आवडला होता. या सिनेमाचा सिक्वल 'एक विलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) या नावाने रीलीज झाला आहे. या सिनेमात अॅक्शन, थ्रिलर पहायला मिळणार आहे तर या सिनेमामध्ये जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पाटनी आणि तारा सुतारिया हे कलाकार पहायला मिळणार आहेत. 

2/5

Vikrant Rona (Box Office)

साऊथ सिनेमांचा सुपरस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) हा 'विक्रांत रोना' (Vikrant Rona) या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा अॅक्शन, थ्रिल आणि सस्पेंसने भरभरुन प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससुद्धा (Jacqueline fernandez) दिसणार आहे. 

3/5

Good Luck Jerry (Disney+ Hotstar)

जान्हवी कपूरचा 'गुड लक जेरी' (Good Luck Jerry) हा सिनेमा Disney+ Hotstar या OTT प्लॅटफॉर्मवर रीलीज होणार आहे. हा सिनेमा Kolamaavu Kokila या तामिळ सिनेमाचा रीमेक आहे.

4/5

Rangbaaz 3: Darr ki Rajneeti (ZEE5)

 राजकारण, भ्रष्टाचार आणि क्राईम यांच मिश्रण असणारी वेब सीरीज म्हणजे रंगबाज या वेब सीरीजचा हा तीसरा सीझन 29 जुलैला ZEE5 वर रीलीज होणार आहे. यावेळी हा सिनेमा बिहारच्या राजकारणावर आधारित आहे.

5/5

Rocketry: The Nambi Effect (Amazon Prime Video)

आर. माधवनचा रॉकेट्री: द नांबी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect) हा सिनेमा 26 जुलैला अमॅझोन प्राईम व्हिडिवर स्टीम केलेला आहे. हा सिनेमा ISRO साइंटिस्ट नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे.