8 लग्न...7 वेळा घटस्फोट; 'या' निळसर डोळ्यांच्या अभिनेत्रींचं टिकलं नाही एकही लग्न, नात्यामध्ये अजिबात करु नका ही गल्लत

योग्य जोडीदार आयुष्यात मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या जीवनात हे सुख असतं असं नाही. असाच अनुभव एका अभिनेत्रीचा आहे. जिने तब्बल 8 वेळा लग्न केलं 7 वेळा घटस्फोट घेतला.... नात्यामध्ये कोणत्या चुका टाळालं. 

| May 16, 2024, 14:22 PM IST

जीवनात खरं प्रेम मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जोडीदारावर तुमचं लग्नानंतरच आयुष्य अवलंबून असतं. जीवनसाथी या नात्याचा अर्थच असा आहे की, जीवनाच्या अंतापर्यंतचा सोबती. पण ही साथ प्रत्येकालाच लाभते असं नाही. अनेकजण अनेकांमध्ये आपल्या परफेक्ट पार्टनरचा शोध सुरुच ठेवतात. एका अभिनेत्रीने एक, दोन नव्हे तर तब्बल 8 वेळा लग्न करुन आणि 7 वेळा घटस्फोट घेऊन आपल्या जोडीदाराचा शोध चालू ठेवला. या अभिनेत्रीचं नाव आहे एलिझाबेथ टेलर. 1950 च्या दशकात हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी त्यांची ओळख होती. 

दोनवेळा ऑस्कर मिळवलेल्या एलिझाबेथ फक्त अभिनयामुळेच तर खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या. हॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन मिळवणाऱ्या या अभिनेत्रीने 8 लग्न केले आणि 7 वेळा घटस्फोट घेतला. या अभिनेत्रीच्या नात्यावरुन ओळखायला पाहिजे की, जीवनात सुखी संसार हवा असेल तर काही गोष्टी टाळणे अत्यंत गरजेचे असते. 

1/8

पहिल लग्न

Elizabeth Taylor Married Life

एलिझाबेथने 18 व्या वर्षी हिल्टन होटल चेनचा मालक कॉनराड हिल्टन ज्युनियरसोबत लग्न केलं. 6 मे 1950 रोजी लग्न केल्यानंतर एलिझाबेथला आपल्या लग्नाच्या निर्णयावर पश्चाताप झाला. मीडिया रिपोर्टनुसार, अवघ्या काही दिवसांतच कॉनराड यांनी दारूच्या नशेत एलिझाबेथसोबत चुकीचा व्यवहार केला. मानसिक त्रासामुळे एलिझाबेथने लग्नाच्या 8 महिन्यांनंतर 29 जानेवारी 1951 रोजी घटस्फोट घेतला. लग्न हा जीवनातील खूप मोठा निर्णय आहे. त्यामुळे तो निर्णय घेत असताना खूप काळजीपूर्वक घेणे गरजेचे आहे. जोडीदाराचा स्वभाव आणि त्याचे वर्तणूक समजून घेणे गरजेचे आहे. 

2/8

दुसरं लग्न

Elizabeth Taylor Married Life

पहिल्या घटस्फोटानंतर एका वर्षात 21 फेब्रुवारी 1952 रोजी एलिझाबेथने 20 वर्षाने मोठ्या असलेला अभिनेता मिशेल विल्डिंगसोबत दुसरं लग्न केलं. या दोघांना मिशेल हॉवर्ड आणि क्रिस्टोफर एडवर्ड अशी मुले देखील झाले. मात्र मिशेल यांचं करिअर खराब होऊ लागलं तेव्हा त्यांच्या खासगी आयुष्यात वाद निर्माण झाले. एलिझाबेथ शूटिंग दरम्यान बाहेर गेले तेव्हा मिशेलने घरी स्ट्रिपर्सला बोलावलं होतं. यानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला.  पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ एकत्र झाल्या की, नात्यामध्ये कटूता येते. अशावेळी दोघांमधील संभाषण अतिशय महत्त्वाचं आहे. नात्यामधील संवाद हे अतिशय महत्त्वाचं आहे. 

3/8

तिसरं लग्न

Elizabeth Taylor Married Life

मिशेलपासून घटस्फोट घेतल्यानंतर, एलिझाबेथ तिसऱ्यांदा गरोदर होती. तेव्हा तिने चित्रपट निर्माता माईक टॉडशी लग्न केले. तिने 1957 मध्ये मुलगी लिसा फ्रान्सिसला जन्म दिला. माईक पब्लिसिटी स्टंटसाठी ओळखला जात होता, 1957 मध्ये त्याने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत 18 हजार पाहुण्यांना आमंत्रित केले होते. एलिझाबेथ आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगत होती पण 1958 मध्ये माईकचा विमान अपघातात मृत्यू झाला. अनेकदा नात्यामध्ये वाद-विवाद असतात. पण आकस्मित काही घडलं तर तुम्ही त्यावर कशी मातम मिळवता हे महत्त्वाचं ठरतं. 

4/8

चौथे लग्न

Elizabeth Taylor Married Life

एलिझाबेथ तिचा तिसरा नवरा माईकच्या मृत्यूनंतर उद्ध्वस्त झाली होती. गायक एडी फिशरने एलिझाबेथला वाईट काळात चांगली साथ दिली आणि दोघेही एकमेकांच्या जवळ आले. पण एडी आधीच विवाहित असल्याने त्यांच्या अफेअरची बातमी समोर आली. एलिझाबेथला अगदी होम ब्रेकर म्हणून टॅग केले गेले. इतकं होऊनही दोघांनी 12 मे 1959 रोजी गुपचूप लग्न केलं. एलिझाबेथ कायमच खऱ्या प्रेमाच्या शोधात चौथ्या लग्नापर्यंतही होती. त्यामुळे जोडीदार निवडताना तुम्ही योग्य विचार करणे गरजेचे आहे. 

5/8

पाचवे लग्न

Elizabeth Taylor Married Life

विवाहित असूनही, एलिझाबेथ 1962 मध्ये को-स्टार रिचर्ड बर्टनच्या प्रेमात पडली. जेव्हा या दोघांना पापाराझींनी एका यॉटमध्ये पकडले तेव्हा या दोघांची बरीच बदनामी झाली. त्यांच्या संबंधांवर असभ्यता पसरवल्याचा आरोप होता. एवढेच नाही तर काही राजकारण्यांनी त्यांना देशातून हाकलून देण्याची मागणीही केली. यावेळी एलिझाबेथने एडीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर केवळ 10 दिवसांनी एलिझाबेथने 1964 मध्ये रिचर्डशी लग्न केले. या घटस्फोटातून असे दिसून येते की, लग्नाच्या वेळी तुम्ही कितीही प्रेमात असलात तरीही वाद होतात. अशावेळी तुम्ही एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते. कारण नाते एकमेकांसाठी खूप महत्त्वाचे असते. 

6/8

सहावे लग्न

Elizabeth Taylor Married Life

रिचर्डशी तिच्या पाचव्या लग्नानंतर, एलिझाबेथने लिसा टॉड आणि मारिया मॅक्वीन यांना दत्तक घेतले. पण लग्नाच्या 10 वर्षांनी रिचर्डने घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर एलिझाबेथला खूप पश्चाताप झाला आणि एका वर्षानंतर 1975 मध्ये तिने रिचर्डशी पुन्हा लग्न केले. मात्र, वर्षभरातच हे नाते तुटले. नात्यात एकदा गाठ पडली की ती नाती कमकुवत राहतात असं म्हणतात. रिचर्ड आणि एलिझाबेथच्या बाबतीत असेच घडले, जरी त्यांनी घटस्फोटानंतर पुन्हा लग्न केले. पण घटस्फोटामुळे अंतर वाढले ते पुन्हा वेगळे झाले. त्यामुळे नातं तुटण्याच्या टोकाला पोहोचणार नाही याची काळजी घ्या.

7/8

सातवे लग्न

Elizabeth Taylor Married Life

रिचर्डनंतर एलिझाबेथच्या जीवनात US सेक्रेटरी जॉन वॉर्नरसोबत 1976 साली लग्न केलं. मात्र काही महिन्यानंतर एलिझाबेथने सिनेमांमध्ये काम करणे बंद करुन पतीच्या पार्टीचे प्रमोशन केले. मात्र तिला या लग्नानंतर पश्चाताप होऊ लागला. कारण एलिझाबेथला राजकारणी व्यक्तीची पत्नी ही ओळख सहन होत नव्हती. या दरम्यान एलिझाबेथ यांना मद्यप्राशनाची सवय लागली, तिचं वजन वाढलं आणि ती डिप्रेशनमध्ये गेली. 1981 साली दोघांनी घटस्फोट घेतला. 

8/8

आठवं लग्न

Elizabeth Taylor Married Life

अनेक दिग्गज व्यक्तींशी लग्न करुन 7 वेळा घटस्फोट घेतल्यानंतर 1991 साली एलिझाबेथ टेलरने 69 साली एका सामान्य कंट्रक्शन वर्कर लॅरीसोबत आठव्यांदा लग्न केलं. या दोघांचं लग्न मायकल जॅक्शनच्या घरी झालं. 5 वर्षांनंतर एलिझाबेथने लॅरीला देखील घटस्फोट दिला.  8 वेळा लग्न आणि 7 वेळा घटस्फोट घेतल्यानंतरही एलिझाबेथ टेलर यांना खरं प्रेम मिळालं नाही. नातं सांभाळत असताना तडजोड महत्त्वाची भूमिका बजावतात.