परिणीती-राघवच्या लग्नाचं कार्ड पाहिलंत का? 23 सप्टेंबरपासून लग्नाचे विधी... पाहा कसा असेल सोहळा

Parineeti Raghav Wedding: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे नेते राघव चड्ढा यांच्या लग्नाला आता अवघे काही दिवस उरलेत. 23 आणि 24 सप्टेंबरला या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पाडणार आहे. लग्नाचे कार्यक्रम कसे असणार याचे फोटो आता समोर आले आहेत.   

Sep 13, 2023, 19:00 PM IST
1/7

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांना आहे. साखरपुडा झाल्यानंतर लग्न कधी करणार याबाबत चांगलाच सप्सेन्स होता. पण आात दोघांच्या लग्नाचं कार्ड समोर आलं आहे. परिणीती आणि राघव याच महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.   

2/7

परिणीती आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा दिल्लीत पार पडला होता. यात बॉलिवूड सेलिब्रेटी आणि अनेक राजकीय नेते उपस्थित होते. आता परिणीती-राघवचं लग्न राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये होणार आहे. उदयपूरच्या अलिशान लीला पॅलेसमध्ये शाही विवाह सोहळा होईल.

3/7

परिणीती आणि राघवचा मे महिन्यात साखरपुडा पार पडला होता. पण लग्नाच्या तारखेबाबत दोघांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता लग्नाची तारीख जाहीर करण्यात आली असून 23 आणि 24 सप्टेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.   

4/7

23 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता परिणीतीचा चूडा सेरेमनी होईल. तर 24 सप्टेंबला दुपारी एक वाजता राघव चड्ढा यांना मुंडावळ्या बांधण्याचा कार्यक्रम असेल. त्यानंतर दुपारी दोन वाजता ताज लेक पॅलेसमधून लग्नाची वरात निघेल.  

5/7

लीला पॅलेसमध्ये दुपारी 3.30 वाजता दोघंही एकमेकांना वरमाला घालतील आणि त्यानंतर 4 वाजता अग्नीभोवती सातफेरे घेतील.  संध्याकाळी सहा वाजता परिणीतीच्या पाठवणीचा सोहळा पार पडेल. 24 तारखेला रात्री 8 वाजता कोर्टयार्डमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलंय.

6/7

परिणीती आणि राघव चड्ढा एका डिनर पार्टीत एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतर दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. यानंतर अनेकवेळा दोघंही एकत्र दिसले. आयपीएल सामन्यांनाही दोघांनीह एकत्र हजेरी लावली होती.

7/7

त्यानंतर 13  मे रोजी दोघांनी साखरपुडा करत आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर आता चार महिन्यांनंतर दोघंही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. या लग्नसोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहाणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.