देशातील 40 टक्के खासदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी; महाराष्ट्राची काय परिस्थिती?

Association for Democratic Reforms Report : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने खासदारांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशातील एकूण 763 खासदारांपैकी 306 खासदारांवर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी 194 खासदारांवर खून आणि महिलांवरील अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Sep 13, 2023, 15:46 PM IST

Association for Democratic Reforms Report : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने खासदारांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशातील एकूण 763 खासदारांपैकी 306 खासदारांवर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी 194 खासदारांवर खून आणि महिलांवरील अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

1/8

देशातील 40 टक्के खासदारांवर गुन्हे

Crimes against 40 percent of MPs in the country

देशातील 40 टक्के विद्यमान खासदारांवर गुन्हे दाखल असून, त्यातील 25 टक्के खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याचे उघड झाले आहे.

2/8

प्रतिज्ञापत्राद्वारे एडीआरने प्रसिद्ध केला अहवाल

Most crimes against Bihar MPs

देशातील 194 खासदारांवर खून आणि महिलांवरील अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.  

3/8

बिहारच्या खासदारांवर सर्वाधिक गुन्हे

Most crimes against Bihar MPs

लक्षद्वीपमधून एक खासदार, केरळमधील 29 पैकी 23 खासदार, बिहारमधील 56 पैकी 41 खासदारांवर गुन्हे दाखल असल्याचे अहवालातून स्पष्ट झालं आहे.

4/8

महाराष्ट्राची काय परिस्थिती?

Out of 65 MPs in Maharashtra, 37 have been booked

महाराष्ट्रातील 65 पैकी 37 खासदारांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर तेलंगणातील 24 पैकी 13 आणि दिल्लीतील 10 पैकी 5 खासदारांवर गुन्हे दाखल आहेत.

5/8

उत्तर प्रदेशच्या खासदारांवर सर्वाधिक गंभीर गुन्हे

Most serious crimes against Uttar Pradesh MPs

एडीआरच्या अहवालानुसार लक्षद्वीपमधील 56 पैकी 28 खासदार, बिहारमधील 24 पैकी 9 खासदार, तेलंगणातील 29 पैकी 10 खासदार, केरळमधील 29 खासदार, महाराष्ट्रातील 22 खासदार आणि उत्तर प्रदेशच्या 37 खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

6/8

भाजपाच्या 139 खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद

Crimes registered against 139 MPs of BJP

भाजपाच्या एकूण 385 खासदारांपैकी 139 खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. तर काँग्रेसच्या 81 खासदारांपैकी 43 खासदारांविरोधात गुन्हे नोंदवले गेले आहेत.

7/8

हत्येचेही गुन्हे दाखल

11 sitting MPs booked for murder

11 विद्यमान खासदारांवर हत्येप्रकरणी गुन्ह्याची नोंद आहे. तर 32 खासदारांविरोधात हत्येचा प्रयत्न करणे या अंतर्गत गुन्ह्यांची नोंद आहे.

8/8

राज्यसभेतील 12 टक्के खासदार अब्जाधीश

12 percent MPs in Rajya Sabha are billionaires

राज्यसभेच्या 225 सदस्यांपैकी 27 खासदार अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश खासदार हे भाजपाचे आहेत. भाजपकडे 225 पैकी 85 सदस्य आहेत, त्यापैकी 6 खासदार अब्जाधीश आहेत. काँग्रेसच्या 30 सदस्यांपैकी 4 खासदार अब्जाधीश आहेत. (सर्व फोटो - PTI)