Entertainment : किंग खानच्या 'पठाण'चा रेकॉर्ड तोडणार हे 7 चित्रपट, पाहा कधी आणि कुठे होणार प्रदर्शित

Bollywood Movies Releasing In 2023: बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान अर्थात शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan)  'पठाण' (Pathaan) चित्रपटाने 2023 या नव्या वर्षाची दमदार सुरुवात करुन दिली. 2022 चं वर्ष बॉलिवूडसाठी अत्यंत वाईट गेलं. पण नव्या वर्षात पठाण चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले आणि बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. आता या वर्षात आणखी काही चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याची चाहत्यांनाही प्रचंड उत्सुकता आहे. यंदाच्या वर्षात असे सात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, जे 'पठाण' चित्रपटाच्या कमाईचा आकडा पार करु शकतात. आपण एक नजर कोणते आहेत हे चित्रपट आणि कधी प्रदर्शित होणार आहेत.

Apr 10, 2023, 19:07 PM IST
1/7

यंदाच्या वर्षात असे आणखी काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, जे 'पठाण' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकतात. यातला पहिला चित्रपट शाहरुख खानचाच आहे. शाहरुखची प्रमुख भूमिका असलेला 'जवान' हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नयनतारा, सान्या मल्होत्रा या प्रमुख भूमिकेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार 2 जून 2023 हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

2/7

'ड्रीम गर्ल'च्या यशानंतर आता त्याचा सिक्वल येतोय. 7 जुलैला देशभरात 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना प्रमुख भूमिकेत आहेत. आयुष्मान खुराला पूजा नावाच्या मुलीच्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. (फोटो क्रेडिट : Instagram@ayushmannk)

3/7

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा बहुचर्चित 'किसी का भाई, किसी की जान' हा चित्रपट रमदान ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सलमान खानबरोबर पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

4/7

'गदर 2' या चित्रपटातून सनी देओल, अमीषा पटेल हे दोघं पुन्हा एकदा तारा सिंह आणि सकीनाच्या भूमिकेतून पडद्यावर पुनरागमन करतायत. 11 ऑगस्टला हा चित्रपटा देशभरात प्रदर्शित होणार आहे. गदर चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. आता गदर 2 ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे लवकरच स्पष्ट होईल. 

5/7

रामायणावर आधारित आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला होता. अनेक वादविवादानंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून येत्या 16 जून ही तारीख निश्चित झाली आहे. 

6/7

रॉकी और रानी की प्रेमी कहानी मध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्याशिवाय धर्मेंद्र आणि शबाना आझमी हे ज्येष्ठ कलाकार भूमिका साकारत आहेत. करण जोहर दिग्दर्शित हा चित्रपट 28 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

7/7

याशिवाय सलमान खान कतरिना कैफचा टायगर 3 याच वर्षी 10 नोव्हेंबरला प्रदर्शित करण्याची योजना आहे. सलमान खानच्या टायगर सीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.