सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन! एंटरटेंनमेंटचा धमाका... या विकेंडला पाहा हे चित्रपट आणि वेबसीरिज

Entertainment : या विकेंडला कोणता चित्रपट (Movie) किंवा वेबसीरिज (Web Series) पाहिची हे जर तुम्ही ठरवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या आठवड्यात ओटीटी (OTT) आणि चित्रपटगृहात दमदार वेबसीरिज आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. सस्पेन्स, थ्रिलर, अॅक्शनने भरपूर असलेल्या या वेबसीरिज आणि चित्रपट तुमचा विकेंड आणखी धमाकेदार करणार आहे. 

| Sep 08, 2023, 20:57 PM IST
1/7

या विकेंडला प्रेक्षकांसाठी एंटरटेंनमेंटचा धमाका असणार आहे. अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, झी5, डिज्नी प्लस हॉटस्टार, जीओवर अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित झाले आहेत. सस्पेन्स, थ्रिलर, अॅक्शन तुम्हाला पसंत असेल तर हे चित्रपट आणि वेबसीरिज खास तुमच्यसाठीच आहेत. 

2/7

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा 'जवान' चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर तब्बल 129.6 इतकी रेकॉर्डब्रेक कमाई जवानने केली आहे. अॅक्शन आणि शाहरुख खानचा दमदार अभिनय पाहायचा असेल तर या विकेंडला जवान हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. पण यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावं लागेल.

3/7

बॉक्सऑफिसवर नुकताच आणखी एक धमाकेदाप चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला. रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट छप्परफाड कमाई करतोय. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही उलब्ध झालाय. अमेझॉन प्राईमवर सर्व भाषेत हा चित्रपट उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

4/7

एंटरटेंनमेंटचा आणखी एक धमाका पाहिला मिळणार तो म्हणजे डिज्नी प्लस हॉटस्टारवर. डिज्नीवर 'द फ्रीलांसर' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. सीरियामध्ये फसलेल्या एका मुलीवर या मालिकेची कहाणी आधारित आहे. फसवणूक करुन या मुलीचं लग्न लावलं जातं आणि तिला सीरियाला नेऊन बंधक बनवलं जातं. एक फ्रीलांसर या मुलीची तिथून सुटका करतो. 

5/7

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा ओटीटीवर पुन्हा एकदा दमदार अभिनय पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. झी5 वर 'हड्डी' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली असून एका ट्रान्सजेंडरची यात कहाणी आहे. एक तरुण लिंगबदल शस्त्रक्रिया करुन हरीचा हरीका होतो. पण ज्या दिवशी हरीकाचं लग्न असतं त्यादिवशी किन्नर समाजातील त्याचे काही शत्रू येऊन त्याचं स्वप्न उद्ध्वस्त करतात. याचा बदला हरीका कसा घेते हे पाहाणं खूपच सप्सेन्स आहे. 

6/7

'आखिरी सच' ही तमन्ना भाटियाची बेवसीरिज सध्या चांगलीच गाजतेय. या मालिकेत तमन्ना एका पोलीस अधिकाराच्या भूमिकेत आहे. दिल्लीत झालेल्या बुराडी हत्याकांडावर आधारित ही वेबसीरिज पाहाताना अंगावर काटा उभा  राहातो. 

7/7

डिज्नी हॉटस्टावर काही महिन्यांपूर्वी 'द नाईट मॅनेजर' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. याचे पाच भाग होते. आता या वेबसीरिजचे पुढचे तीन भाग डिज्नीवर आले आहे. तुन्ही आधीचे पाच भाग पाहिले असतील तर नवे भाग तुम्हाला नक्कीच आवडतील. आपल्या ध्येयापर्यंत 'नाइट मॅनेजर' पोहचणार का हे नव्या भागात पाहिला मिळणार आहे.