भारतात किती स्पर्धा परीक्षा रद्द झाल्या? उमेदवारांवर यामुळं काय परिणाम होतो?

भारतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये भविष्य़ घडवण्याची संधी तरुणाईला विविध स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून मिळते. पण, गेल्या काही दिवसांपासून याच स्पर्धा परीक्षांवरून देशात द्वंद्व पाहायला मिळत आहे.

Jun 21, 2024, 14:16 PM IST

भारतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये भविष्य़ घडवण्याची संधी तरुणाईला विविध स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून मिळते. पण, गेल्या काही दिवसांपासून याच स्पर्धा परीक्षांवरून देशात द्वंद्व पाहायला मिळत आहे.

1/8

नोकरी आणि अभ्यास परीक्षा रद्द

Exams canceled in India

भारतात पेपर फुटल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. गेल्या सात वर्षांत विविध राज्यांमध्ये 70 हून अधिक पेपर फुटले ज्यामुळं  अनेक तरुणांच्या भविष्यावर त्याचा परिणाम झाला आहे. पेपरफुटीची प्रकरणं वाढली आणि अखेर प्रशासनानंच काही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

2/8

महाराष्ट्रात HSC पेपर लीक

Exams canceled in India

2023 मध्ये, महाराष्ट्रातील एका महाविद्यालयात गणिताचा पेपर फुटला आणि रसायनशास्त्र , भौतिकशास्त्राचे पेपरही लीक झाल्याचे पुरावे समोर आले होते. प्रत्येक परीक्षेच्या काही वेळापूर्वीच पेपर व्हॉट्सॲपद्वारे प्रसारित केले जात होते.  

3/8

तेलंगणा SSC पेपर लीक

Exams canceled in India

 तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात एका गावात परीक्षेदरम्यान हिंदीचा पेपर लीक झाला होता. लीक झालेले पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यानंतर शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करावी लागली. 2023 मध्ये दुसऱ्यांदा ही घटना घडली. 

4/8

आसाम HSLC पेपर लीक

Exams canceled in India

 आसामच्या माध्यमिक शिक्षण मंडळाने पेपर लीक झाल्यामुळे इंग्रजी आणि सामान्य विज्ञानासाठी हायस्कूल लीविंग सर्टिफिकेट (HSLC-मार्च 2023) ही परीक्षा रद्द केली. शिक्षणमंत्री रनोज पेगू यांनी सीआयडी चौकशीसाठी आदेश दिल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली.

5/8

UP पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा

Exams canceled in India

UP पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 17 आणि 18 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेली  UP पोलीस भरती  दलात 60,244 पदे भरण्यासाठी सुमारे 16 लाख महिलांसह 48 लाखांहून अधिक उमेदवारांनी UP पोलीस भरती परीक्षा दिली होती. 2,385 केंद्रांवर चार टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. ज्याचा पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली होती. 

6/8

UGC-NET-2024 परीक्षा रद्द

Exams canceled in India

विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC-NET) 19 जून 2024 रोजी एका संशयामुळे रद्द करण्यात आली. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे.

7/8

पेपर लिक विद्यार्थ्यांवर परिणाम

Exams canceled in India

भारतात पेपर फुटण्याच्या वाढत्या घटनांमुळे केवळ परीक्षाच रद्द कराव्या लागल्या नाहीत तर अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्यावर मोठा परिणाम झाला. 

8/8

करिअर योजनांमध्ये व्यत्यय

Exams canceled in India

  परिक्षा रद्द केल्यामुळं विद्यार्थ्यांवर तणाव वाढू शकतो आणि विद्यार्थांना नोकरीच्या शोधात इतर पैलूंवर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. त्यामुळं परीक्षांच्या संपूर्ण सत्रावर आणि आयोजनावर लक्ष ठेवत योग्य मार्गानं परीक्षा प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची मागणी जोर धरत आहे.