EXCLUSIVE : 'कारभारी लयभारी' : राजवीर आणि प्रियांकाच्या विवाह सोहळ्याची रंगत न्यारी

पियू-राजवीरच्या लग्नाचे खास फोटो 

Feb 27, 2021, 15:33 PM IST

मुंबई : सध्या मालिकांमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसतायत, असाच एक लग्न सोहोळा ‘कारभारी लयभारी’ (Karbhari Laybhari)  मध्ये अनुभवता येणार आहे. राजकारणावर बेतलेली कारभारी लयभारी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, सूर्यवंशी आणि पाटील ही दोन राजकीय घराणी आणि त्यांच्यात असलेले राजकीय वैर हे सर्वज्ञात आहे.

1/10

पियू सजून धजून लग्नासाठी तयार होते. तिला घरची आठवण येते. वीरु सुद्धा छान सजलाय. आई ऐवजी काकी सगळीकडे वरमाईच्या थाटात मिरवते. 

2/10

घरासमोरच लग्न लावलं जातंय. पण अंकुशराव काहीतरी गडबड करणार याची धाकधूक सर्वांच्याच मनात आहे म्हणून घराभोवती मुलांनी कडक पहारा ठेवलाय. 

3/10

काकी मुद्दामहून अंकुशरावपर्यंत खबर पोहोचेल अशी व्यवस्था करते. लग्न विधी सुरु असताना कन्यादानाचा विषय येतो आणि त्याचवेळी अंकुशराव दारात पोहोचतो. 

4/10

अंकुशराव लग्नाचा तमाशा करतो. पियूला खेचून नेत तिला जीवे मारण्याची भाषा करतो. 

5/10

काकीला सगळ्याची मजा येतेय तरीपण ती मध्ये पडते. अंकुशरावला समज द्यायला पोलिसांना मध्ये आणते. पियू पोलिसांना सांगते की मी माझ्या मर्जीने लग्न करतेय. 

6/10

अंकुशरावचा पाणउतारा होतो...अपमानित होऊन तो निघू लागतो. अखेर सर्व अडचणींवर मात करून राजवीर आणि प्रियांका चा विवाह सोहोळा संपन्न होतो.

7/10

तेव्हा पाहायला विसरू नका विवाह विशेष सप्ताह “कारभारी लयभारी” १ मार्च ते ८ मार्च सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. आपल्या झी मराठीवर.

8/10

9/10

10/10