Facebook : कोण पाहतंय तुमची फेसबुक प्रोफाइल? 'असं' चेक करा

Facebook Update : फेसबुकचा वापर करणे आता अनेकांसाठी सोपे झाले आहे. अगदी स्त्रियांपासून छोट्या मुलांपर्यंत फेसबुकचा दररोज वापर करीत असतात. जगभरात फेसबुकवर कोट्यवधी लोक आपला बराच वेळ घालवत असतात.

Mar 19, 2023, 16:43 PM IST
1/5

अनेक यूजर तुमची फेसबुकवर प्रोफाइल पाहत असतात. आणि याची कसलीच माहिती तुम्हाला सुद्धा नसते. मात्र आता ते सहज समजू शकते. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करा. 

2/5

तुम्हाला सर्वात अगोदर Facebook Web वापरावी लागणार आहे. त्यानंतर आता याठिकाणी तुम्हाला आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करावे लागणार आहे. 

3/5

जेव्हा तुम्ही वेब आवृत्तीवर लॉग इन करता तेव्हा तुम्हाला याठिकाणी उजवे क्लिक करावे लागणार आहे. तुम्हाला view page source चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. 

4/5

यानंतर तुम्हाला Control + F बटण दाबावे लागणार आहे. आता सर्च बारवर जाऊन तुम्हाला Buddy ID वर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणताही आयडी कॉपी करून नवीन टॅबमध्ये उघडावा लागणार आहे.  

5/5

आता तुम्हाला URL स्पेसमध्ये Facebook.com/15-अंकी आयडी लिहावा लागणार आहे. हे टाइप केल्यानंतर प्रविष्ट करावे लागणार आहे. एंटर केल्यानंतर, तुमचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीचे फेसबुक प्रोफाइल तुमच्या समोर येईल.