प्रेमात पडायला फक्त 4 मिनिट पुरे! संशोधनातही सिद्ध झालेले प्रेमाचे 'हे' 7 नियम

प्रेम ही एक अशी भावना आहे ज्याचा अनुभव प्रत्येकजण घेत असतो. अशावेळी संंशोधनात समोर आले 7 महत्त्वाचे खुलासे. 

| Jan 31, 2024, 13:09 PM IST

प्रेम ही अतिशय तरल भावना आहे. प्रत्येकाचा प्रेमाचा अनुभव हा वेगळा आहे. आपण प्रेमात कसे पडतो तिथपासून एका क्षणाच्या त्या नजरा-नजरेनंतर संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीसोबत घालवायला कसे तयार होतो? असे एक ना अनेक प्रश्न या नात्यामध्ये प्रत्येकाला पडत असतात. 'प्रेम' या विषयावर अनेक संशोधनही झालंय. आता झालेल्या संशोधनानुसार प्रेमासंदर्भात 5 सायन्टिफिक थिअरी समोर आल्या आहेत. हे जाणून घेऊया. 

1/7

प्रेम ही अतिशय महत्त्वाची भावना

scientific theories about love

अगदी कवी, चित्रकार आणि प्रत्येक व्यक्तीच गेल्या कित्येक काळापासून प्रेम ही भावना ओळखण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रेम ही अतिशय गुंतागुंत असलेली भावना आहे. काहींसाठी ही भावना अतिशय खास असते. समोरच्या व्यक्तीसाठी एक अतिशय गुंतागुंतीची भावना निर्माण होते. गेल्या कित्येक काळापासून प्रेम या विषयावर संशोधन केलं जात आहे. संशोधकांना आता काही आश्चर्यकारक सिध्दांत यामध्ये सापडले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. 

2/7

जोडीदारात शोधतात पालकांची प्रतिमा

scientific theories about love

प्रत्येक मुलगा हा आईचा लाडका असतो. तर मुली वडिलांच्या अगदी जवळ असतात. हीच प्रेमाची भावना पुढे संशोधनात समोर आली आहे. जोडीदार निवडताना आपल्या पालकाची प्रतिमा आपण त्यामध्ये शोधत असतो. युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूजचे संशोधक डेव्हिड पेरेट यांना असे आढळून आले की, रोमँटिक नातेसंबंधात पुरुष मुख्यतः त्यांच्या आईसारख्या दिसणाऱ्या किंवा त्या स्वभावाच्या मुलींना प्राधान्य देतात, तर मुली जोडीदारात कायमच आपल्या वडिलांची प्रतिमा त्यांच्या जोडीदारात शोधत असतात. 2002 मध्ये न्यू सायंटिस्ट मासिकाच्या 'लाइक फादर लाइक हसबंड' या लेखात या अभ्यासाचे निष्कर्ष नोंदवले गेले.

3/7

अवघ्या 4 मिनिटांत प्रेमात पडतात

scientific theories about love

न्यू यॉर्क टाईम्सने केलेल्या एका अभ्यासानुसार, लोकांना एकमेकांच्या प्रेमात पडायचा फक्त चार मिनिटे पुरेसे असतात. एकमेकांना टक लावून पाहिल्यावर प्रेमाची भावना निर्माण होते. त्यामुळे लव्ह ऍट फर्स्ट साईड हे खरं असू शकतं. कारण प्रेमासाठी अवघे 4 मिनिटेही पुरेसे आहेत. 

4/7

खाण्याच्या सवयीचा डेटिंगवर परिणाम

scientific theories about love

डेटिंग ॲप 'आर यू इंटरेस्टेड?'च्या अभ्यासात, लोकांना विचारण्यात आले की, एखाद्या व्यक्तीच्या आहाराच्या सवयींचा त्यांच्या डेट करण्याच्या निर्णयावर परिणाम होतो का? अभ्यासानुसार, मुली मांसाहारी जोडीदार निवडतात तर मुलं शाकाहारी जोडीदार निवडतात. कारण खाण्याच्या आवडी निवडीचा परिणाम त्यांच्या डेटिंगवर होत असतो. 

5/7

प्रेम एक नशा आहे

scientific theories about love

होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे! न्यूयॉर्कच्या अल्बर्ट आइनस्टाइन कॉलेजच्या अभ्यासानुसार, जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा आपल्या मेंदूला उच्च भावना जाणवते. आणि ही भावना माणसांना कोकेनचे प्रमाण जास्त असताना मिळते तशीच असते. त्यामुळे प्रेमाची एक धुंदी अनुभवता येते. यामुळेच जोडीदारासोबत ब्रेकअप होणे देखील खूप वेदनादायक वाटते.

6/7

काही वर्षांनी दोघं सारखीच दिसतात

scientific theories about love

तुम्ही कधी लक्ष दिले आहे का, अनेक वर्षांनी जोडपे एकसारखेच दिसायला लागतात? याला आता विज्ञानाचा पाठिंबा आहे. प्रेमाच्या मानसशास्त्रावरील अभ्यासानुसार, लक्षात आले की 25 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ विवाहित असलेल्या जोडप्यांच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये सारखीच होती आणि एकसारखे दिसले. हे विविध कारणांमुळे असू शकते जसे की समान आहार आणि जीवनशैली, वातावरण, जीवनातील आव्हाने आणि बरेच काही.

7/7

प्रेम व्यक्त करणे गरजेचे

scientific theories about love

प्रेम व्यक्त करत असताना त्याला शब्दांची गरज लागत नाही. अगदी स्पर्शाने आणि नजरेनेही प्रेम व्यक्त केले जाते. पण प्रेम व्यक्त होणे गरजेचे असते. एकमेकांबद्दल वाटणारी भावना कायमच मोकळेपणाने मांडता आली पाहिजे. आपल्या जोडीदाराबद्दल आपल्याला काय वाटतं, हे समजून घेणं आणि त्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचवणे अत्यंत गरजेचे असते.