फ्लॉप असूनही करोडोंची मालकीण, नेमकं करते तरी काय मलायका अरोराची बहीण?

Amrita Arora Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराची बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोरा आज तिचा 43 वा वाढदिवस साजरा करते. अमृताचं फिल्मी करिअर हे फ्लॉप  होतं. मात्र, तिचं खासगी आयुष्य हे नेहमीच चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यात तिचं पाकिस्तानी मूळ क्रिकेटरसोबत अफेअर ते मित्राच्या नवऱ्यासोबत लग्न या अनेक गोष्टी चर्चेत राहिल्या आहेत. 

| Jan 31, 2024, 13:04 PM IST
1/7

मलायकाची बहीण अमृता

malaikaarorassisteramritaisownerofcrores

बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोराचा आज 31 जानेवारी रोजी 43 वा वाढदिवस आहे. अमृताचा जन्म 1981 मध्ये झाला होता. अमृतानं तिच्या करिअरची सुरुवात मोठी बहीण अमृतापणे एक व्हिडीओ जॉकी म्हणून केली.   

2/7

बॉलिवूडमध्ये पदार्पण

malaikaarorassisteramritaisownerofcrores

अमृतानं 2022 मध्ये 'कितने दूर कितने पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

3/7

आयटम नंबरमुळे चर्चेत

malaikaarorassisteramritaisownerofcrores

अमृता अरोराच्या अभिनयापेक्षा तिचं आयटम नंबर 'दिल्ली की सर्दी' खूप जास्त लोकप्रियता मिळाली होती. 

4/7

पाकिस्तानी वंशजासोबत रिलेशनशिप

malaikaarorassisteramritaisownerofcrores

अमृताचं नाव 2004 मध्ये पाकिस्तानी वंशज इंग्रिलश क्रिकेटर उस्मान अफजालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं की उस्मान जेव्हा भारतात मॅच खेळण्यासाठी आला होता तेव्हा त्याची आणि अमृताची भेट झाली होती आणि ते रिलेशनशिपमध्ये आले होते. 

5/7

बिझनेसमॅनशी लग्न

malaikaarorassisteramritaisownerofcrores

उस्मान अफजालसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 2009 मध्ये अमृता अरोरानं बिझनेसमॅन शकील लडाकशी लग्न केलं. रिपोर्ट्सनुसार, शकील आणि अमृता हे कॉलेजमधील मित्र आहेत. शकील आणि अमृताची 2005 मध्ये पुन्हा भेट झाली. 

6/7

घटस्फोट देत अमृताशी केलं लग्न

malaikaarorassisteramritaisownerofcrores

शकील लडाकच्या पहिल्या लग्नात काही अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यानंतर 2008 मध्ये शकीलनं त्याची पहिली पत्नी निशाला घटस्फोट देत अमृताशी लग्न केलं. त्यांनी ख्रिश्चन, मुस्लिम आणि पंजाबी या तीन पद्धतींनी केलं. 

7/7

चित्रपट आणि ग्लॅमरच्या जगापासून लांब

malaikaarorassisteramritaisownerofcrores

अमृता आणि शकीलला दोन असून अजान आणि रेयान अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्या जन्मानंतर अमृतानं चित्रपट आणि ग्लॅमरच्या जगापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. तरी ती आज कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. (All Photo Credit : Social Media)