पत्नीच्या नावाने घेतलेल्या प्रॉपर्टीवर कुटुंबियांचाही हक्क! कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तेवर कुटुंबाचाही हक्क आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे घर आणि जमिनीची नोंदणी करण्यापूर्वी उच्च न्यायालयाचा निर्णय जाणून घ्या.

Feb 25, 2024, 16:47 PM IST
1/7

allahabad high court

अलाहाबाद उच्च न्यायालयाने कौटुंबिक मालमत्तेच्या वादावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर कोणतीही मालमत्ता खरेदी केली असेल आणि ती नोंदणीकृत केली असेल तर तिच्या कुटुंबातील सदस्यांचाही त्यात हिस्सा असेल.

2/7

Rights to property

मृत वडिलांच्या मालमत्तेवर हक्क मागणाऱ्या मुलाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अरुण कुमार सिंग देशवाल यांनी निर्णय दिला. याचिकाकर्त्याच्या वडिलांनी खरेदी केलेली मालमत्ता ही कौटुंबिक संपत्ती मानली जाईल कारण हिंदू पती कुटुंबाच्या फायद्यासाठी पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतो.

3/7

high court

उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं की, महिलेने स्वत:च्या कमाईने ही मालमत्ता खरेदी केल्याचे सिद्ध झाल्यावरच कुटुंबातील सदस्यांचा मालमत्तेवर हक्क मानला जाणार नाही

4/7

house wife

पण ती महिला गृहिणी असल्यास आणि तिच्या नावावर कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यात आली तर कुटुंबातील इतर सदस्यांचाही त्यावर हक्क असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.  

5/7

wife income

जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की पत्नीने कमावलेल्या उत्पन्नातून मालमत्ता खरेदी केली आहे, ती पतीने स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली मालमत्ता मानली जाईल आणि कुटुंबाचाही त्यावर अधिकार असेल, असेही कोर्टानं म्हटलं

6/7

property dispute

याचिकाकर्ता, सौरभ गुप्ता यांनी त्यांच्या वडिलांनी खरेदी केलेल्या मालमत्तेमध्ये एक चतुर्थांश हिस्सा मिळावा म्हणून दिवाणी खटला दाखल केला होता आणि त्याला मालमत्तेत सह-भागीदार म्हणून घोषित करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्याने युक्तिवाद केला की तो त्याच्या आईसह या मालमत्तेत सह-भागीदार आहे.

7/7

Property transferred

ही मालमत्ता त्याच्या आईच्या म्हणजेच मृत वडिलांच्या पत्नीच्या नावावर खरेदी केलेली असल्याने, मालमत्ता तृतीय पक्षाकडे हस्तांतरित केली जाऊ शकते. त्यामुळे मालमत्ता त्रयस्थ व्यक्तीकडे हस्तांतरित करू नये, असा मनाई आदेश कोर्टाकडून मागविण्यात आला होता.