सलमान खानचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना बसतोय धक्का; फोटो समोर

'बिग बॉस 17'चा ग्रँण्ड फिनाले नुकताच मोठ्या थाटात पार पडला. हा शो होस्ट केल्यानंतर सध्या भाईजान त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमासाठी अभिनेता सध्या जोरदार मेहनत घेत आहे. फिटनेसवर काम करताना अभिनेत्याने जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन केलं. सध्या अभिनेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Feb 06, 2024, 19:36 PM IST

मुंबई : 'बिग बॉस 17'चा ग्रँण्ड फिनाले नुकताच मोठ्या थाटात पार पडला. हा शो होस्ट केल्यानंतर सध्या भाईजान त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमासाठी अभिनेता सध्या जोरदार मेहनत घेत आहे. फिटनेसवर काम करताना अभिनेत्याने जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन केलं. सध्या अभिनेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

1/7

अभिनेत्याचं कमालीचं ट्रांसफॉर्मेशन

व्हायरल होणाऱ्या या फोटोत अभिनेत्याचं कमालीचं ट्रांसफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. त्याचं ट्रांसफॉर्मेशन सगळ्यांनाच हैराण करत आहे.   

2/7

अभिनेत्याने शेअर केला फोटो

सोमवारी एका चाहत्याने सलमानच्या वांद्रे येथील घरात भाईजानसोबतचा फोटो काढला आणि तो X वर शेअर केला. 

3/7

सलमान खानचा लूक

सलमान खान या फोटोत काळ्या रंगाच्या बनियान आणि हिरव्या ट्राउजरमध्ये दिसत आहे. त्याने एक ग्रे रंगाची कॅपही घातली आहे. फोटोसाठी स्माईल देताना अभिनेता यावेळी दिसत आहे. 

4/7

फोटो व्हायरल

हा फोटो व्हायरल होताच लोकांनी असं म्हणायला सुरुवात केली आहे की, सलमान खान 'टाइगर 3'च्या रिलीजनंतर आपला लूक लपवताना दिसला. तो चोरुन आपल्या आगामी प्रोजेक्टची तयारी करत आहे.

5/7

'द बुल' या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत

'द बुल' या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये तो ब्रिगेडियर फारुख बुलसाराची भूमिका साकारणार आहे. 

6/7

यासाठी करावं लागलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

देशभक्तीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन करणार आहेत., सलमान खानला त्याचं पात्र जिवंत करण्यासाठी खूप बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करावं लागलं आहे. 

7/7

सलमान दिसणार 'या' भूमिकेत

1988 मध्ये मालदीवमध्ये 'ऑपरेशन कॅक्टस'चं नेतृत्व करणाऱ्या फारुख बुलासरच्या भूमिकेत सलमान खान दिसणार आहे.