Photos: 'लग्नाला पोरगी मिळालीच पाहिजे', 'कोल्हापूरात समुद्र झालाच पाहिजे'... तरुणांची सायकल रॅली

Kolhapur Cycle Rally 2024 In Search Of Girls: कोल्हापूरकरांचा नादच खुळा असतोया. इशय कोणताही असो खटक्यावर बोट टांगा पलटी.... मग त्यात गंभीर प्रश्न असेल तर तो मांडण्यासाठी कोल्हापूरकर कसे गप्प बसतील.. सध्या तरुणांच्या डोक्यात असणारा इशय रांगड्या कोल्हापूरकरांनी गंभीरतेने पण मजेशीर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. ह्याच इशयाबद्दल जाणून घेऊयात...

| Feb 06, 2024, 15:15 PM IST
1/10

Kolhapur Cycle Rally 2024 In Search Of Girls for Marriage

कोल्हापूरमध्ये एका अनोख्या, गमतीशीर पण गंभीर विषयाच्या सायकल फेरी पार पडली.  

2/10

Kolhapur Cycle Rally 2024 In Search Of Girls for Marriage

ही सायकल फेरी कोल्हापुरातल्या खासबाग मैदान ते प्रयाग चिखली इथं असणाऱ्या पंचगंगा नदीच्या संगमापर्यंत काढण्यात आली होती. या सायकल फेरीची सर्वत्र जोरदर चर्चा सुरू आहे.

3/10

Kolhapur Cycle Rally 2024 In Search Of Girls for Marriage

या सायकल फेरीमध्ये लावण्यात आलेले फलक हटके होते. ज्यामध्ये लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे अशी प्रमूख मागणी कोल्हापूरकर तरुणांनी केली होती.

4/10

Kolhapur Cycle Rally 2024 In Search Of Girls for Marriage

लग्नाळू मुलांसाठी मुली मिळत नाहीत म्हणून कोल्हापूरकरांनी चक्क शहरातून पंचगंगा नदीच्या संगमापर्यंत सायकल फेरी काढल्या.   

5/10

Kolhapur Cycle Rally 2024 In Search Of Girls for Marriage

मंगळवार पेठेतल्या चिक्कू मंडळाच्या गँगने ही सायकल रॅली काढत गंभीर विषय मांडलाय. देखण्या माधुरी दीक्षितच्या फोटोचे पूजन करून या तरुणांनी रॅलीला सुरुवात केली.

6/10

Kolhapur Cycle Rally 2024 In Search Of Girls for Marriage

या सायकल फेरीमध्ये 49 वर्षाचे रामचंद्र जगताप यांनी देखील सहभाग नोंदविला. जगताप यांचे जवळपास लग्नाचे वय निघून गेलं आहे. तरी देखील आपल्या सायकलवर कोणीतरी डबल सीट बसले पाहिजे असं आजही त्यांना वाटतय. 

7/10

Kolhapur Cycle Rally 2024 In Search Of Girls for Marriage

लग्नासाठी पोरगी मिळत नाही. त्यात गाडी इंधन टाकून पोरी हुडका जायचं म्हणजे गाडीत टाकायला इंधन पाहिजे. पण इंधन एवढं महागलय मग पोरी शोधाय जायचे कसं असा प्रश्न तरूणांना पडलाय.

8/10

Kolhapur Cycle Rally 2024 In Search Of Girls for Marriage

कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे, बंबात लाकूड गुळगुळीत मिळाले पाहिजे, मटन स्वस्त झालेच पाहिजे अशा मागण्यांबरोबर जीवनावश्यक असणारे पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे, पाण्यावर गाड्या चालल्या पाहिजेत अशा मागण्या देखील कोल्हापूरकराच्या आहेत.  

9/10

Kolhapur Cycle Rally 2024 In Search Of Girls for Marriage

चिकू तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मांडलेला विषय हार्ड आहे. पण गमतीशीर सायकल फेरी म्हणून अनेकजण या रॅलीकडे पाहत आहेत.  

10/10

Kolhapur Cycle Rally 2024 In Search Of Girls for Marriage

खरं तर आपण आपल्या अवतीभवती नजर टाकल्यास चिकू तरुण मंडळाने मांडलेले सर्वच मुद्दे डोळ्यात अंजन घालणारे आहेत.