केसरपासून केळ्यापर्यंत..प्रजनन क्षमता वाढवतील हे पदार्थ

अनेक जोडपी प्रजनन क्षमतेच्या समस्येशी झगडत असतात. अशावेळी काही पदार्थांच्या नियमित सेवनामुळे ही समस्या कमी करता येऊ शकते.

| Feb 03, 2024, 16:50 PM IST

Fertility boosting foods: अनेक जोडपी प्रजनन क्षमतेच्या समस्येशी झगडत असतात. अशावेळी काही पदार्थांच्या नियमित सेवनामुळे ही समस्या कमी करता येऊ शकते.

1/7

केसरपासून केळ्यापर्यंत..प्रजनन क्षमता वाढवतील हे पदार्थ

Fertility boosting foods better Sex Life Health Tips

Fertility Boosting Foods: आई-वडिल व्हावं ही सर्वच जोडप्यांची इच्छा असते. पण आजकल प्रजनन क्षमतेची समस्या भेडसावणारी अनेक जोडपी डॉक्टरांच्या वाऱ्या करत आहेत. अनहेल्थी डाएट, लाइफस्टाइल अशी अनेक कारणे यामागे असतात.

2/7

दोघांसाठी उपयुक्त

Fertility boosting foods better Sex Life Health Tips

पण असे अनेक पदार्थ आहेत जे खाल्ल्याने प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते. यांच्या सेवनाने डोपामाइन वाढते आणि शरिरात हॅप्पी हार्मोन्स वाढतात. महिला आणि पुरुष या दोघांसाठीदेखील हे पदार्थ उपयुक्त ठरतात. 

3/7

केसर

Fertility boosting foods better Sex Life Health Tips

केसर हे एक एंटीऑक्सीडेंट म्हणून काम करते. यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणुची क्वालिटी वाढवण्यास मदत होते. केसर हे महिलांमध्ये मूड बूस्टर म्हणून कार्य करते. केसर दुधात मिसळून प्यायल्यास महिला आणि पुरुष दोघांनाही चमत्कारिक फायदे दिसतील.

4/7

केळे

Fertility boosting foods better Sex Life Health Tips

केळ्यामध्ये पोटॅशियम असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. पुरुष आणि महिला दोघेही याचे सेवन करु शकतात. केळ्यात विटामिन बी 6 असते. जे शरिरात हार्मोन आणि मासिक पाळीतील समस्या नियंत्रणात ठेवतात. यातील विटामिन बी 6 अंडाणू आणि शुक्राणूच्या विकासाला चालना देतात.

5/7

अक्रोड

Fertility boosting foods better Sex Life Health Tips

अक्रोडमुळे शुक्राणुची गतिशीलता वाढवण्यासाठी मदत होते. यात ओमेगा3 फॅटी ऍसिड असते. ज्यामुळे शुक्राणुंची क्वालिटी वाढण्यास मदत होते. नाश्त्यामध्ये तुम्ही याचे सेवन करु शकता. दररोज 75 ग्राम अक्रोड खाऊ शकता.

6/7

लसूण

Fertility boosting foods better Sex Life Health Tips

लसणीमध्ये एलिसिन आणि सेलेनियम असते. एलिसिन लैंगिक अवयवातील रक्त प्रवाहात सुधारणा करते. सेलेनियम एक अँटी-ऑक्सिडेंट आहे जे गतिशीलतेमध्ये सुधारते. बाळासाठी प्रयत्न करत असाल तर दिवसात एक किंवा दोन लसणीचे सेवन करा. 

7/7

डार्क चॉकलेट

Fertility boosting foods better Sex Life Health Tips

डार्क चॉकलेट शुक्राणुची गतिशीलता आणि शुक्राणुंची संख्या सुधारण्यास मदत करते. महिलांमध्ये हे तणाव कमी करण्याचे काम करते. यामुळे डोपामाइनची पातळी वाढण्यास मदत होते. अशा अनेक कारणामुळे फर्टिलिटी वाढण्यास मदत होते.