Holi Types in India: कुठे होळी तर कुठे लठमार होळी, भारतात किती प्रकारच्या होळी खेळल्या जातात? जाणून घ्या...

Types of Holi in India: भारतात सण आणि उत्सवांची मोठी पंरपरा आहे. आपल्या देशात विविध धर्मांचे आणि परंपरेचे लोक एकत्र नांदतात. जितके धर्म तितके सणही गुण्या गोविंदाने साजरे केले जातात. (Indian festivals and celebrations) वर्षभरात दसरा, दिवाळी, नवरात्रोत्सव, गणेश चतुर्थी असे अनक सण साजरे केले जातात. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा आणखी एक सण म्हणज होळी (Holi). वसंत ऋतुमध्ये साजरा केला जाणारा हा महत्वपूर्ण सण. होळी हा रंगांचा सण (Ranga Panchami) म्हणूनही ओळखला जातो. संपूर्ण देशभरात हा सण साजरा होत असला तरी ती साजरा करण्याची परंपरा मात्र वेगवेगळी आहे.

Mar 06, 2023, 15:47 PM IST
1/9

महाराष्ट्र

महाराष्ट्र

Holi in Maharashtra: महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत होळीचा सण साजरा केला जातो. होलिकादहन केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी गुलाल, अबीर आणि विविध रंगाची उधळण करून धुळवड साजरी केली जाते. महाराष्ट्रातील कोकणता हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोकणात याला शिमगा असं म्हणतात. खास कोकणातील शिमग्यासाठी मुंबईतील चाकरमनी आवर्जुन यासाठी कोकणात जातात. 

2/9

लट्ठमार होळी - उत्तरप्रदेश

लट्ठमार होळी - उत्तरप्रदेश

Holi in Uttar Pradesh: होळी आणि रंगपंचमीचा सण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मथूरा, वृंदावन, गोकूळ या ठिकाणची होळी पाहण्यासाठी देशभरातीलच काय तर परदेशातूनही लोकं खास उत्तर प्रदेशमध्ये येतात. मथुरा जवळील बरसाना या गावातील लठमार होळी विशेष प्रसिद्ध आहे. होळीच्या दिवशी इथले स्त्री-पुरुष एकमेकांना काठीने मारतात. उत्तरप्रदेशमधील ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या अनोखी प्रथा आहे. 

3/9

खडी होळी – उत्तराखंड

खडी होळी – उत्तराखंड

Holi in Uttarakhand: देवांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये होळी सणाला विशेष महत्त्व आहे. होळीच्या दिवशी इथली लोकं पारंपारिक वस्त्र परिधान करतात. तसंच पारंपारिक गाण्यावर ताल धरत होळी साजरी करतात. याला बैठीका होळी, खडी होळी असंही म्हटलं जातं. 

4/9

होला मोहल्ला – पंजाब

होला मोहल्ला – पंजाब

Holi in Mohalla Punjab:शीख धर्मियांचं पवित्र धर्मस्थान श्री आनंदपूर साहिब इथं होळीच्या दुसऱ्या दिवशी सुरु होणाऱ्या यात्रेला होला महल्ला असं म्हटलं जातं. शीख धर्मींयांमध्ये होला मोहल्लाचं खास महत्त्व आहे. इथ होळी पौरुषी प्रतीक म्हणून साजरी केली जाते. यासाठी गुरु गोविंद सिंह यांनी होळी याचा पुल्लिंग शब्द होल असा प्रयोग सुरु केला. होला मोहल्ला सहा दिवस साजरा केला जातो. या दरम्यान घोड्यावर स्वार होत हातात तलवार घेत साहसी खेळ दाखवले जातात. तसंच किर्तन आणि रंगांची बरसात केली जाते.

5/9

दोल जात्रा – पश्चिम बंगाल

दोल जात्रा – पश्चिम बंगाल

Holi in West Bengal: पश्चिम बंगालमध्ये दोल जात्रा हा होळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. यादिवशी स्त्रिया लाल काठाच्या पारंपारिक सफेद साड्या परिधान करतात. तसंच शंख वाजवत राधा-कृष्णाची पूजा करतात. त्या दिवशी सकाळी ढोल-ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढली जाते. यात कोरड्या रंगांची आणि फुलांची उधळण केली जाते. दोल या शब्दाचा अर्थ झोपाळा. या दिवशी झोपाळ्यावर राधा-कृष्णाची मूर्ती ठेवून भक्तीगीत गायलं जातं. 

6/9

याओसांग – मणिपुर

याओसांग – मणिपुर

Holi in Manipur: मणिपूरमध्ये फाल्गुन महिन्यात याओसांग पर्व साजरं केलं जातं जे होळीशी मिळतं जुळतं आहे.  इथे धुळवडला पिचकारी दिवस म्हटलं जातं. याओसंग नावाचा अर्थ छोट्याश्या झोपडीशी आहे. पोर्णिमेच्या दिवशी नदी किनारी एक छोटीशी झोपडी बनवली जाते. यात चैतन्य महाप्रभूंची प्रतिमा स्थापित केली जाते. त्यानंतर पूजा करुन या झोपडीचं दहन केलं जातं. या झोपडीसाठी लागणारं साहित्य 8 ते 13 वर्षांच्या मुलांकडून आसपासच्या गावात चोरून आणण्याची प्रथा आहे. याओसांगीच राख इथली लोकं आपल्या मस्तकाला लावतात.

7/9

मंजल कुली – केरळ

मंजल कुली – केरळ

Holi in Kerala: दक्षिणेत होळी हा सण काही अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जातो. पण दक्षिण भारतातील काही समुदायात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. याला मंजल कुली असं म्हणतात. या दिवशी रंगांची उधळ करत मंजल कुली हा सण साजरा केला जातो.  

8/9

फगुआ – बिहार

Holi Types in India

Holi in Bihar: होळीचा खरा उत्साह पाहिचा असेल तर तुम्ही एकदा बिहारला भेट द्याच. बिहारमध्ये वसंत पंचमीनंतर रस्त्या रस्त्यावर होळीची गाणी गायली जातात. होळीच्या दिवसांपर्यंत ही परंपरा सुरु असते. बिहारमध्ये याला फगुआ असं म्हटलं जातं. फगुआचा अर्थ फाल्गुन महिना असा होता. होळीच्या दिवशी धुळ आणि चिखलात होळी खेळली जाते. त्यानंतर दुपारी आंघोळ करुन पुन्हा रंगांनी होळी खेळतात. संध्याकाळी डोक्याला अबीर लावून गावात फिरून फगुआ गायलं जातं. या दिवशी मोठ्या प्रमाणावर लोकं भांग पितात. 

9/9

रॉयल होळी – राजस्थान

रॉयल होळी – राजस्थान

Holi in Rajasthan: राजस्थानमध्ये देखील होळी साजरी केली जाते. पण इथं राजेशाही थाटात होळी साजरी करण्याची परंपरा आहे. होळी दहनाआधी होलिकेला फुलांनी सजवलं जातं.. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या घोडागाडीवरुन मिरवणूक काढली जाते. मिरवणूकीनतर विधिवत होलिकेला अग्नी दिला जातो.