भारताची पहिली आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवा, प्रवाशांना थेट 'या' देशात जाता येणार

First International Train Services: भारत आणि भूतान दरम्यान आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवा लवकरच सुरु केली जाणार आहे.  भारतातील आसाममधून शेजारील राष्ट्रामध्ये ही ट्रेन चालवली जाईल. दोन्ही राष्ट्रांमधील पर्यटन सुधारण्याच्या उद्दीष्टाने ही ट्रेन सुरु करण्यात येत आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. भूतान रेल्वे प्रवाशांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सूक असल्याचेही ते म्हणाले.

| Aug 07, 2023, 16:09 PM IST

First International Train:भारत आणि भूतान दरम्यान आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवा लवकरच सुरु केली जाणार आहे.  भारतातील आसाममधून शेजारील राष्ट्रामध्ये ही ट्रेन चालवली जाईल. दोन्ही राष्ट्रांमधील पर्यटन सुधारण्याच्या उद्दीष्टाने ही ट्रेन सुरु करण्यात येत आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. भूतान रेल्वे प्रवाशांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सूक असल्याचेही ते म्हणाले.

1/8

भारताची पहिली आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवा, प्रवाशांना थेट 'या' देशात जाता येणार

First International Train Services Between India to Bhutan Soon Railway News in Marathi

First International Train: भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. त्यामुळे कमी किंमतीत देशभरात फिरण्यासाठी रेल्वे प्रवासाचा पर्याय निवडला जातो. तर देशाबाहेर जाण्यासाठी आपण विमानाचा पर्याय निवडतो. 

2/8

रेल्वेने प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

First International Train Services Between India to Bhutan Soon Railway News in Marathi

पण आता भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. यानुसार भारतीय रेल्वेकडून पहिली आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहे. 

3/8

आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवा लवकरच

First International Train Services Between India to Bhutan Soon Railway News in Marathi

भारत आणि भूतान दरम्यान आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवा लवकरच सुरु केली जाणार आहे.  भारतातील आसाममधून शेजारील राष्ट्रामध्ये ही ट्रेन चालवली जाईल. दोन्ही राष्ट्रांमधील पर्यटन सुधारण्याच्या उद्दीष्टाने ही ट्रेन सुरु करण्यात येत आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. भूतान रेल्वे प्रवाशांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सूक असल्याचेही ते म्हणाले.

4/8

रेल्वे लिंकवर चर्चा

First International Train Services Between India to Bhutan Soon Railway News in Marathi

आम्ही भूतान आणि आसाममधील रेल्वे लिंकवर चर्चा करत आहोत, भूतान पर्यटकांसाठी अधिक पॉइंट उघडण्यास उत्सुक आहोत आणि ते आसामसाठी खूप चांगले आहे, असे डॉ एस जयशंकर म्हणाले.

5/8

बांगलादेशशी संपर्क

First International Train Services Between India to Bhutan Soon Railway News in Marathi

दरम्यान, भारत नेपाळ आणि बांगलादेशशी संपर्क वाढविण्यावर काम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. जयशंकर यांनी गेल्या नऊ वर्षांत चीनसोबतच्या सीमेसह सीमावर्ती पायाभूत सुविधांवरही लक्ष दिले आहे.

6/8

रेल्वे मार्गाचे बांधकाम

First International Train Services Between India to Bhutan Soon Railway News in Marathi

भारत आणि भूतानमधील रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरू करण्याचे सर्वेक्षण एप्रिल 2023 मध्ये पूर्ण झाले आहे. हा रेल्वे मार्ग भूतानचे गेलेफू आणि भारतातील आसाममधील कोक्राजर यांना जोडेल, असे वृत्त भूतान लाइव्हने दिले आहे. 

7/8

2026 पर्यंत पूर्ण

First International Train Services Between India to Bhutan Soon Railway News in Marathi

या 57 किमी लांबीच्या रेल्वे लिंकचे बांधकाम 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी भारत सरकारकडून निधी दिला जाईल. या मार्गावरील ट्रेन ईशान्य सीमा (एनएफ) रेल्वेद्वारे चालविली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

8/8

भारत ते बांगलादेश

First International Train Services Between India to Bhutan Soon Railway News in Marathi

दुसरीकडे भूतान पाठोपाठ आता बांगलादेशमध्ये देखील ट्रेनने पोहोचता येणार आहे. यासंदर्भातील निर्णय अंतिम टप्प्यात आहे. बांगलादेश रेल्वे दळणवळण यावर्षी आगरतळा येथून सुरू केले जाईल, अशी माहिती त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी दिली. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून ईशान्येकडील राज्यांचा चेहरामोहरा बदलला आहे.