Shravan 2024: श्रावणात भोलेनाथांच्या 'या' प्रभावशाली मंत्रांचा करा जप, मानसिक तणाव होईल दूर

भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच शिवभक्त श्रावणातील सोमवारी महादेवांची उपासना करतात. 

Aug 06, 2024, 17:32 PM IST
1/7

फलप्राप्तीसाठी महादेवांची श्रावण महिन्यात आराधना केली जाते. हिंदू पुराणानुसार, श्रावण महिन्याची एक आख्यायिका सांगितली जाते. 

2/7

असं म्हणतात की सतीने महादेवांशी विवाह व्हावा म्हणून श्रावण महिन्यात कठोर व्रत केलं होतं. म्हणून महादेवांना श्रावण प्रिय असल्याचं म्हटलं जातं. 

3/7

जे शिवभक्त शिवपिंडीवर जलाभिषेक करतात आणि महादेवांच्या मंत्राचा जप करतात, त्यांना भोलेनाथांचा आशिर्वाद प्राप्त होतो. श्रावण सोमवारी महादेवांच्या मंत्राचा जप जरी केला तरी महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना भोलेनाथ देखील म्हटलं जातं. 

4/7

शिवपंचाक्षरी मंत्र

ओम नम: शिवाय  याचा अर्थ असा की, मी शिवाला नमन करतो. महादेव हे  आदि आणि अंत आहेत. या मंत्राचा जप केल्याने आत्मिक शांती मिळते. जर तुम्ही मानसिक नैराश्यात असाल तर या मंत्राचा जप केल्याने मनावर नियंत्रण मिळवता येतं, असं  हिंदू शास्त्रात सांगितलं जातं. 

5/7

रुद्र मंत्र

ओम नमो भगवते रुद्राय  गाळ्यात रुद्राच्या माळा परिधान केल्यामुळे महादेवांना रुद्रदेव असंही म्हणतात. या मंत्राचा अर्थ असा की, मी रुद्राला प्रणाम करतो. असं म्हटलं जातं की, या मंत्राचा जप केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.   

6/7

शिव गायत्री मंत्र

ॐ महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये धीमहि तन्नः शिवः प्रचोदयात् || महादेव हे वैरागी होते. या मंत्राचा अर्थ असा की,  या महान योगी समोरला मी वंदन करतो. महादेवांच्या या मंत्राच्या जपाने मनातील भिती दूर होते आणि डोक्यातील अतिविचार थांबतात. असं हिंदू शास्त्र सांगतं.   

7/7

शिव ध्यान मंत्र

करचरण कृतं वाक्कयजं कर्मजं वा । श्रवणनयनजं वा मानसं वपराधं । विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व । जय जय करुणाबद्ध श्रीमहादेव शम्भो ॥  भोलेनाथांचा हा मंत्र प्रभावशाली आहे असं शास्त्र सांगतं, याचा अर्थ असा की शिव आणि शिव हे एकच आहे. त्यामुळे प्रत्येक अंतराम्यात शिव वास करतो असं म्हटलं जातं.  ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )