राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळणार मोफत उपचार; डायग्नोस्टिकसह सर्व तपासण्या, रक्त चाचण्या देखील फ्रीमध्ये

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत.  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

Aug 03, 2023, 22:56 PM IST

Free medical treatment :  राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाचे एकूण 2418 रुग्णालयं आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये गरीब आणि गरजूंवर निशुल्क उपचार करण्यात येणार आहेत. 

1/8

राज्यातल्या जनतेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आज सरकट मोफत उपचार देण्याची घोषणा करून एक क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. 

2/8

येत्या 15 ऑगस्ट पासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तशा स्पष्ट सूचना सर्व आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. 

3/8

या क्रांतिकारी निर्णयामुळे यापुढे महाराष्ट्रातील जनतेला सर्व तपासण्या, रक्त चाचण्या, सर्व डायग्नोस्टिक सेवा अगदी मोफत मिळतील.

4/8

 महाराष्ट्रातील जनतेला दर्जेदार चांगले व निरोगी जीवन जगण्यासाठी या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

5/8

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण करत असताना महाराष्ट्र शासनाने राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने  एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.

6/8

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये सर्व उपचार व तपासण्या सरसकट मोफत केल्या जाणार आहेत. 

7/8

पूर्वी केसपेपर काढण्यासाठी आणि नंतर उपचारासाठी रुग्णांना बराच वेळ वाट पाहत बसावं लागत होतं. आता हा वेळ वाचणार आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार आहेत.

8/8

या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्नित राज्यातील सर्व 2 हजार 418 आरोग्य संस्थांचा समावेश असणार आहे.