हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी, पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

Jan 21, 2019, 11:49 AM IST
1/5

पर्यटक घेतायंत आनंद

पर्यटक घेतायंत आनंद

बर्फवृष्टीमुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातारवण आहे. पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लूटत आहेत.

2/5

पाऊस आणि बर्फवृष्टीचा परिणाम

पाऊस आणि बर्फवृष्टीचा परिणाम

हवामान विभागाने पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. राज्यात 24 जानेवारीपर्यंत पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.

3/5

पर्यटकांसाठी सूचना

पर्यटकांसाठी सूचना

स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना सूचना देण्यात आल्या आहेत की, 24 जानेवारीपर्यंत डोगराळ भागात जावू नका. कारण बर्फवृष्टीमुळे मार्ग बंद होऊ शकतो. शिमला, नारकंडा, कुफरी, चैल, मनाली आणि डलहौजीमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

4/5

शून्याच्या खाली गेला पारा

शून्याच्या खाली गेला पारा

लाहौल आणि स्पीति या ठिकाणी तापमान शून्य ते 3.5 डिग्री सेल्सियसदरम्यान पोहोचलं आहे.

5/5

शिमल्यात थंडी वाढली

शिमल्यात थंडी वाढली

शिमला  येथे तापमानात घट झाली आहे. येथे तापमान 7.5 डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आलं. कल्पामध्ये तापमान शून्य ते 0.6 डिग्रीच्या खाली गेलं. मनालीमध्ये 3.4 डिग्री, डलहौजीमध्ये 5.1 डिग्री, कुफरीमध्ये 3.8 डिग्री आणि धर्मशालामध्ये 6 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली.