Lust Stories 2 ते 'द नाईट मॅनेजर - सीझन 2' या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होतील 'हे' चित्रपट आणि सीरिज

Weekend OTT Releases : गेल्या काही दिवसांपासून 'आदिपुरुष' आणि 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटांची चर्चा सुरु आहे. त्यात प्रेक्षक सारा अली खान आणि विक्की कौशलच्या 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट पाहण्यास पसंती देत आहेत. पण बघायला गेलं तर कोणत्यानं चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली असं म्हणून शकतं नाही. आता 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता विकेंड पाहता अनेक लोक चित्रपट पाहण्याचा विचार करत आहेत.

| Jun 28, 2023, 17:54 PM IST
1/6

'लस्ट स्टोरीज 2' (Lust Stories 2)

Weekend OTT Releases

'लस्ट स्टोरीज' हा चित्रपट हिट ठरल्यानंतर आता त्याचा दुसरा भाग आला आहे. हा चित्रपट उद्या 29 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

2/6

'द विचर - सीझन 3' (The Witcher Season 3)

Weekend OTT Releases

रिवियाच्या गेराल्ट राक्षसांचा शिकार करण्यासाठी त्याचा प्रवास हा सुरु ठेवतो. या सीरिजमध्ये हॅनरी कॅविल आणि आन्या चलोत्रा हे कलाकार आहेत. ही सीरिज देखील उद्या म्हणजेच 29 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

3/6

Sergeant

Weekend OTT Releases

Sergeant हा एक स्पाय - थ्रिलर चित्रपट आहे. यात रणदीप हुडा, अरुण गोविल, आदिल हुसेन आणि सपना पब्बी देखील आहेत. हा चित्रपट तुम्ही 30 जून रोजी जियो सिनेमावर पाहू शकता. 

4/6

'जॅक रायन - सीझन 4' (Jack Ryan Season 4)

Weekend OTT Releases

जॉन क्रॉसिंस्की आता पुन्हा एकदा आपल्याला जॅक रायनच्या भूमिकेता दिसणार आहे. आता तो आपल्याला डिप्टी सीआईचा डायरेक्टर म्हणून दिसणार आहे. हा त्याचा फायनल सीझन असेल असे म्हटले जाते. हा सीझन आपल्याला अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 30 जून रोजी पाहायला मिळेल. 

5/6

अफवाह (Afwaah)

Weekend OTT Releases

नवाजुद्दीन सिद्दीकीचा अफवाह हा चित्रपट 30 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत भूमि पेडनेकर, सुमित व्यास, सुमित कौल, शारिब हाशमी हे कलाकार दिसणार आहेत.

6/6

'द नाईट मॅनेजर - सीझन 2' (The Night Manager Part 2)

Weekend OTT Releases

'जॉन ले कॅरे' यांच्या याच नावाच्या पुस्तकावर ही सीरिज आधारीत आहे. आदित्य रॉय कपूर, तिलोत्तमा शोम आणि शोभिता धूलिपाला यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या या सीरिजचा दुसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज 30 जून रोजी तुम्हाला डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.