एक अनोखं रेल्वे जंक्शन, जिथून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणं शक्य

मथुरा रेल्वे जंक्शनमधून तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकता. या जंक्शनबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

Jun 28, 2023, 15:38 PM IST

Mathura Junction: मथुरा रेल्वे जंक्शनमधून तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकता. या जंक्शनबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

1/7

एक अनोखं रेल्वे जंक्शन, जिथून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणं शक्य

Mathura Junction UP Central Railway reach every corner of the country

Mathura Junction: देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे विस्तारले आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. असे असले तरी एका शहरातून दूरवरच्या कोणत्यातरी शहरात जायचे असेल तर ट्रेन बदलाव्या लागतात. पण असेही एक जंक्शन आहे जिथून देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी ट्रेन मिळतात.

2/7

रेल्वे जंक्शनबद्दल

Mathura Junction UP Central Railway reach every corner of the country

भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आणि तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या मथुरा शहराला तुम्ही अनेकदा भेट दिली असेल. जर तुम्ही इथे ट्रेनने पोहोचला असाल तर तुम्ही मथुरा जंक्शनवर उतरला असाल. या रेल्वे जंक्शनबद्दल माहिती घेऊया.

3/7

7 वेगवेगळ्या मार्गांच्या गाड्या

Mathura Junction UP Central Railway reach every corner of the country

मथुरा जंक्शन उत्तर मध्य रेल्वेमध्ये येते. या जंक्शनवरून 7 वेगवेगळ्या मार्गांच्या गाड्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांना जातात.  

4/7

जंक्शनमध्ये 10 प्लॅटफॉर्म

Mathura Junction UP Central Railway reach every corner of the country

देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक, मथुरा जंक्शनमध्ये 10 प्लॅटफॉर्म आहेत जिथून नेहमी गाड्या जातात.

5/7

रात्रंदिवस गाड्या

Mathura Junction UP Central Railway reach every corner of the country

दिल्लीहून केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश यासह अनेक राज्यांकडे जाणाऱ्या गाड्या मथुरा जंक्शन क्रॉस करुनच जातात. या जंक्शनवर रात्रंदिवस गाड्या येत-जात असतात.

6/7

मथुरा जंक्शनवर 197 ट्रेन थांबे

Mathura Junction UP Central Railway reach every corner of the country

मथुरा जंक्शनवर 197 ट्रेन थांबे आहेत. यामध्ये राजधानी, शताब्दी, जनशताब्दी, गरीब रथ, 57 मेल एक्स्प्रेस, मेमू-डेमू ट्रेन, 6 संपर्क क्रांती, 114 सुपर फास्ट ट्रेन इ.

7/7

दररोज 13 गाड्या सुटतात

Mathura Junction UP Central Railway reach every corner of the country

येथून दररोज 13 गाड्या सुटतात. देशातील बहुतांश शहरांमध्ये जाण्यासाठी मथुरा जंक्शनवरून ट्रेन पकडता येते. 1875 मध्ये मथुरा जंक्शन येथे पहिल्यांदा ट्रेन धावली होती.