चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोकडून मानवाला अवकाशात पाठवण्याची तयारी, 'असा' आहे प्लॅन!
Gaganyaan Mission: गगनयान मोहिमेत सहभागी होणाऱ्या अंतराळवीरांना रशियाकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील चार कुशल वैमानिकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते. हे प्रशिक्षण आता पूर्ण होत आले आहे.
Gaganyaan Mission: गगनयान मिशन ही अंतराळवीरांना अंतराळात पाठवणारी भारताची एकमेव अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत इस्रो अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किमी वर अंतराळात जाण्यासाठी पाठवणार आहे. गगनयानच्या प्रक्षेपणात मानवरहित वाहन रॉकेटच्या माध्यमातून अवकाशात पाठवले जाणार आहे.