ॐ नमस्ते गणपतये...; 'दगडूशेठ' बाप्पांसमोर 36 महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Ganeshotsav 2023 : याच चर्चांमध्ये समोर येणारं एक नाव म्हणजे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या गणपतीसमोर यंदाही महिलांनी समूह अथर्वशीर्ष पठण केलं.   

Sep 20, 2023, 10:10 AM IST

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: Ganesh chaturthi 2023 : मंगळवारी महाराष्ट्रासह देशविदेशात गणेशोत्सवाची मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली आणि संपूर्ण वातावरण मंगलमय झालं. त्यातच पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणं काही गणेशोत्सव मंडळांची चर्चाही सुरु झाली आहे. 

1/7

ॐ नमस्ते गणपतये...

Ganesh chaturthi 2023 31 thousand women performed atharvashirsha in front of pune dagdusheth halwai ganpati

ॐ नमस्ते गणपतये...; 'दगडूशेठ' बाप्पांसमोर 36 महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण   

2/7

गणेशोत्सव

Ganesh chaturthi 2023 31 thousand women performed atharvashirsha in front of pune dagdusheth halwai ganpati

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दगडूशेठ गणपतीसमोर ॐ नमस्ते गणपतये...  त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि... असे सामूहिक स्वर सुरु झाले आणि संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.   

3/7

मंगलमय वातावरण

Ganesh chaturthi 2023 31 thousand women performed atharvashirsha in front of pune dagdusheth halwai ganpati

इथं उपस्थित असणाऱ्या तब्बल 36 हजार महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरयाचा जयघोष अंगावर शहारा आणणारा होता. एका क्षणात इथलं वातावरण कमालीचं मंगलमय झालं होतं.   

4/7

प्रसन्नतेची अनुभूती

Ganesh chaturthi 2023 31 thousand women performed atharvashirsha in front of pune dagdusheth halwai ganpati

बुधवारी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. पुण्याच्या सह पोलीस आयुक्तांसह मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.   

5/7

आश्चर्याची बाब

Ganesh chaturthi 2023 31 thousand women performed atharvashirsha in front of pune dagdusheth halwai ganpati

आश्चर्याची बाब म्हणजे रशिया आणि थायलंडहून आलेल्या परदेशी भक्तांनी देखील यावेळी अथर्वशीर्ष पठणामध्ये सहभाग घेतला होता. दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचं हे 36 वं वर्ष.   

6/7

टाळ्यांचा गजर

Ganesh chaturthi 2023 31 thousand women performed atharvashirsha in front of pune dagdusheth halwai ganpati

इथं आलेल्या महिलांनी हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला अभिवादन केलं तर, मोबाईलची टॉर्च उंचावून देखील महिलांनी गणरायाचा जयघोष केला.   

7/7

उत्सव मंडपासमोर गर्दी

Ganesh chaturthi 2023 31 thousand women performed atharvashirsha in front of pune dagdusheth halwai ganpati

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. यावेळी उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकाच्या पुढेपर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता.