100 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला असा अद्भुत योग, 'या' लोकांना बाप्पा बनवणार करोडपती

भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार असून त्यासोबतच 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यावर्षी गणपती बाप्पा 3 राशीच्या लोकांसाठी अनेक भेटवस्तू घेऊन येत आहेत.

| Sep 05, 2024, 17:14 PM IST

Ganesh Chaturthi Rashifal: भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार असून त्यासोबतच 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यावर्षी गणपती बाप्पा 3 राशीच्या लोकांसाठी अनेक भेटवस्तू घेऊन येत आहेत.

1/7

Rashifal 7 September 2024 : यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सव सुरु होत आहे. 10 दिवसांच्या या उत्सवात 12 राशींपैकी काही राशींचं नशीब फळफळणार आहे. यंदा 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. 

2/7

100 वर्षांनंतर दुर्लभ योग

यंदा भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी खूप खास आहे कारण 100 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला दुर्मिळ योगायोग घडत आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्मयोग आणि इंद्र योग यांचा संयोग आहे. तसेच स्वाती आणि चित्रा नक्षत्र असतील.

3/7

शुभ मुहूर्त

अशाप्रकारे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश स्थापना आणि उपासनेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त असेल. तसेच 3 राशीच्या लोकांसाठी ग्रह आणि नक्षत्रांची ही स्थिती खूप शुभ असणार आहे. या लोकांना एवढा आनंद आणि समृद्धी मिळेल की गणेशोत्सवाबरोबरच या लोकांच्या आयुष्यातही सणांचा काळ सुरू होईल, असे म्हणता येईल.

4/7

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी खूप शुभ परिणाम देईल. तुमची सर्व कामे एक एक करून पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला मोठा फायदा होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. संपत्ती वाढेल. जीवनात आनंद मिळेल.  

5/7

कर्क

गणेश चतुर्दशीचे दिवस कर्क राशीसाठी उत्सवासमान असणार आहेत. या राशीच्या लोकांना अपार धन प्राप्त होणार आहे. तुमचं कामकाज अतिशय चांगल चालणार आहे. समाजात मान प्रतिष्ठा मिळेल. 

6/7

कन्या

गणेश पर्व कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात खूप धन समृद्धी घेऊन येणार आहे. या दिवसांत कन्या राशीच्या लोकांच्या सर्व समस्या दूर होतील. करिअरमध्ये आतापर्यंत असलेले सगळे प्रश्न, अडथळे दूर होतील. गुंतवणुकीसाठी हा कालावाधी छान आहे. चांगल्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक करा. 

7/7

गणेशोत्सव

गणेशोत्सवाचा काळ हा अतिशय आनंद आणि उत्साह घेऊन येतो. आराध्य दैवत मानला जाणारा गणराज या दिवसांमध्ये अनेकांच्या घरी येतो. गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केल्यामुळे एक मंगलमय वातावरण अनुभवायला मिळतं. त्यामुळे हा सण प्रत्येकासाठीच सकारात्मक असणार आहे.