Ganesh Visarjan 2023 : विसर्जन मिरवणुकांदरम्यान 'हा' नियम विसरु नका, अन्यथा ओढावेल संकट

Ganesh Visarjan 2023 : शहरातील मोठ्या गणशोत्सव मंडळांपुढं आता प्रडचंड गर्दी होण्यास सुरुवात झाली असून, टप्प्याटप्प्यानं आता या मिरवणुका मार्गस्थ होणार आहेत.   

Sep 28, 2023, 08:27 AM IST

Ganesh Visarjan 2023 : मुंबईत मोठ्या धामधुमीत विसर्जन मिरवणुका सुरु झाल्या आहेत. तर, काही ठिकाणी विसर्जन मिरवणुकांसाठीची तयारी आता शेवटच्या टप्प्य़ामध्ये आली आहे. 

1/7

नियमांकडेही लक्ष द्या.

Ganesh Visarjan 2023 Mumbai no Visarjan procession allowed on 13 bridges bmc rules latest update

Ganesh Visarjan 2023 : तत्पूर्वी प्रशासनाच्या नियमांकडेही लक्ष द्या. कारण लहानशी चुकही अनेकांनाच संकटात टाकू शकते.   

2/7

मिरवणुकांवर निर्बंध

Ganesh Visarjan 2023 Mumbai no Visarjan procession allowed on 13 bridges bmc rules latest update

विसर्जन मिरवणुकांच्या धर्तीवर शहरातील काही रेल्वे पुलांवर मिरवणुकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.   

3/7

लालबागमधील चिंचपोकळीच्या पुलाचाही समावेश

Ganesh Visarjan 2023 Mumbai no Visarjan procession allowed on 13 bridges bmc rules latest update

या पुलांमध्ये लालबागमधील चिंचपोकळीच्या पुलाचाही समावेश आहे. तर, मध्य रेल्वेचे चार आणि पश्चिम रेल्वेचे नऊ पुलांवर मिरवणुकांदरम्यान काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.   

4/7

काळजी घेण्याचं आवाहन

Ganesh Visarjan 2023 Mumbai no Visarjan procession allowed on 13 bridges bmc rules latest update

या पुलांवरून गणेश मूर्ती नेत असताना मंडळातील 100 जणांव्यतिरिक्त एकाच वेळी इतर व्यक्ती जाणार नाहीत याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. शिवाय विसर्जन मिरवणूक जुन्या आणि नव्या पुलांवर कुठंही थांबणार नाहीत यांची मंडळांनी आणि कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी.   

5/7

शिवाय पुलावर गर्दीस नाचण्यास बंदी

Ganesh Visarjan 2023 Mumbai no Visarjan procession allowed on 13 bridges bmc rules latest update

पुलांवर कोणत्याही प्रकारचा डीजे, ढोल पथकांचं वादन न करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. शिवाय पुलावर गर्दी थिरकण्यास सुरुवात करणार नाही याचीसुद्धा काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.   

6/7

धोकादायक पुलांमध्ये ...

Ganesh Visarjan 2023 Mumbai no Visarjan procession allowed on 13 bridges bmc rules latest update

धोकादायक पुलांमध्ये महालक्ष्मी स्टील रेल्वे पूल, प्रभादेवी कॅरोल रेल्वे पूल, दादर टिळक रेल्वे पूल, बेलासीस पूल (मुंबई सेंट्रल स्टेशनच्या जवळ), फॉकलँड पूल (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), केनडी पूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मधील पूल आणि मरिन लाइन्स रेल्वे ओव्हर ब्रिजचा समावेश आहे.   

7/7

भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज...

Ganesh Visarjan 2023 Mumbai no Visarjan procession allowed on 13 bridges bmc rules latest update

तर, मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज, आर्थररोड रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी पूल, करीरोड रेल्वे ओव्हर ब्रिज,  घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज या पुलांचाही यामध्ये समावेश आहे.