श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंना गौतम गंभीरने दिली वॉर्निंग, म्हणाला...

Indian Squad for Sri Lanka Series: राहुल द्रविड यांच्यानंतर आता गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला टीम इंडियाचा हेड कोच बनवण्यात आलं आहे. 26 जुलैपासून गौतम गंभीर टीम इंडियाची जबाबदारी स्विकारेल. 

| Jul 12, 2024, 21:40 PM IST
1/5

गंभीरचा कडक शब्दात संदेश

श्रीलंका दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने काही खेळाडूंना स्पष्ट वॉर्निंग दिली आहे. जे खेळाडू तिन्ही फॉरमॅट खेळत नाहीत, त्यांना गंभीरने कडक शब्दात संदेश दिला आहे. स्टार स्पोर्टने याचा व्हिडीओ शेअर केलाय.

2/5

दुखापत

दुखापती हा खेळाडूंच्या जीवनाचा एक भाग आहे आणि जर तुम्ही तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत नसाल तुम्ही तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळले पाहिजे, असं गंभीर म्हणतो.

3/5

व्यावसायिक क्रिकेट

तिन्ही फॉरमॅटमुळे तर तुम्हाला दुखापत होईल, तुम्ही परत जा आणि बरे होऊन पुन्हा या. व्यावसायिक क्रिकेटकडे खूप कमी वेळ असतो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त खेळायचे असते, असंही गंभीर म्हणतो.

4/5

तिन्ही फॉरमॅट खेळा

जेव्हा तुम्ही खूप चांगल्या फॉर्ममध्ये असता तेव्हा पुढे जा आणि तिन्ही फॉरमॅट खेळा. जर तुमच्या मनाला विश्वास असेल की तुम्ही लोकांच्या हितासाठी योग्य ते करू शकता, असंही गंभीर म्हणतो.

5/5

गौतम गंभीरचा निशाणा कोणावर?

दरम्यान, क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाही जिथे तुम्ही स्वतःबद्दल विचार करता. हा एक सांघिक खेळ आहे जिथे संघ प्रथम येतो, असंही गंभीरने म्हटलं आहे. त्यामुळे आता गौतम गंभीरचा निशाणा हार्दिक पांड्यावर तर नाही ना? असा सवाल विचारला जातोय.