टीम इंडियाचा हेड कोच झाल्यावर Gautam Gambhir ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला '1.4 अब्ज भारतीयांना...'

Gautam Gambhir Instagram post : बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या हेड कोचपदी गौतम गंभीरची निवड केल्यानंतर आता गौतमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Saurabh Talekar | Jul 09, 2024, 11:26 PM IST
twitter
1/5

गौतम गंभीर नवा हेड कोच

गौतम गंभीर यांना भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहे, असं जय शहा यांनी म्हटलं आहे.

twitter
2/5

गौतम गंभीरची पोस्ट

जय शहा यांनी गौतम गंभीरच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता गौतम गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. 

twitter
3/5

देशसेवा

भारत ही माझी ओळख आहे आणि देशाची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विशेषाधिकार आहे, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.

twitter
4/5

प्रत्येक भारतीयाला अभिमान

वेगळी हॅट परिधान करूनही मला परत येण्याचा सन्मान वाटतो. पण प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, हे माझे ध्येय नेहमीच राहिले आहे, असंही गंभीरने म्हटलं आहे. 

twitter
5/5

भारतीयांची स्वप्नं टीम इंडियाच्या खांद्यावर

तब्बल 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्नं टीम इंडियाच्या खांद्यावर आहेत आणि ही स्वप्ने साकार करण्यासाठी मी माझ्या सामर्थ्याने सर्वकाही करेन, असा विश्वास गंभीरने यावेळी व्यक्त केला.

twitter