GK : सोन्यापेक्षाही महाग विकले जातात हत्तीचे दात, जाणून घ्या त्या पासून कोणत्या वस्तू बनतात

Why Ivory Is Expensive: हत्तीचे दात मोठ्या किंमतीत विकले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगली हत्तींची शिकार केली जाते. परिणामी हत्तींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. हत्तीचे दात सोन्यापेक्षाही महाग का विकले जातात याबाबत अनेक जणांना माहिती नाही. हस्तीदंतापासून अनेक वस्तू बनवल्या जातात, त्यामुळे त्याला बाजारात मोठी मागणी आहे. 

Jul 06, 2023, 21:50 PM IST
1/5

हस्तीदंताचे दागिने

हस्तीदंतापासून दागिने बनवले जातात. यात हार, बांगड्या यांचा समावेश असतो. हस्तीदंताचे दागिने अंगावर घालून मिरवणं हे स्टेट्स सिंबॉल मानलं जातं. या लाखो रुपयांना हे दागिने विकले जातात. 

2/5

इतिहासात नोंद

हस्तीदंतापासून बनवलेल्या दागिन्यांचा उल्लेख इतिहासातही आढळलोत. पुरातन काळात राजघराण्यातील लोकं हस्तीदंताच्या दागिन्यांचा वापर करत होती. त्यावेळच्या संस्कृतीचा हा एक भाग होता. 

3/5

धार्मिक कारण

धार्मिक कारणं आणि अंधश्रद्धेमुळे देखील हस्तीदंताला मोठी मागणी असते. लोक हत्तीचे पुतळे घरी ठेवतात. तथापि, समृद्धी, चांगले आरोग्य आणि ज्ञान मिळवण्यासाठी हत्तीच्या मूर्ती ठेवल्या जातात.

4/5

कोरिव वस्तू

याशिवाय हत्तीच्या दातापासून अनेक कोरीव वस्तू बनवल्या जातात. यात बुद्धीबळ सेट, पियानो, यासारख्या वस्तू बनतात. पारंपारिक औषधांसाठीही हस्तीदंत एक उपचार घटक म्हणून पाहिला जातो. 

5/5

दातांसाठी हत्तीची शिकार

हत्तींची शिकार अवैध आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमांतंर्गत हत्तीची शिकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. पण दात मिळवण्यासाठी अनेकवेळा हत्तींची शिकार केली जाते.