'या' व्यायामान काहीच दिवसात कमी होईल वजन, फक्त रोज 20 मिनिटं करा 'हे' काम

Skipping For Weight Loss : गेल्या 2-3 वर्षांपासून म्हणजेच कोरोनानंतर अनेकांचं सतत वजन वाढतंय. वजन कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. कारण तेव्हापासून अनेकांना वर्क फ्रॉम होम मिळालं आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळत नाही अशात आता वाढतं वजन पाहता. ते कमी कसं करायचं असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आज आपण दोरी उड्यांच्या सहाय्यानं कसं वजमी कमी होऊ शकतं ते जाणून घेणार आहोत. 

| Jul 06, 2023, 19:24 PM IST
1/7

वाढलेलं वजन कमी करणं आव्हानात्मक

Skipping For Weight Loss

आजच्या व्यस्त जीवनशैलीत शरीरातील चरबी कमी करणे काहीसे आव्हानात्मक झाले आहे . व्यायामशाळेत तासनतास घाम गाळण्यासाठी किंवा महागड्या आहारतज्ञांना परवडण्याइतका वेळ प्रत्येकाकडे नसतो. मात्र, वजन कमी करण्यासाठी एक सोपा उपाय आहे.  

2/7

काही दिवसातच दिसेल परिणाम दिसेल

Skipping For Weight Loss

आज आपण वजन कमी करण्यासाठी एक अशी सोपी पद्धत जाणून घेणार आहोत जी तुम्हाला काही दिवसात तुमचे अतिरिक्त वजन कमी करण्यात मदत करू शकते 

3/7

दोरी उड्या

Skipping For Weight Loss

दोरी उड्या मारल्यानं तुम्हाला अॅक्टिव्ह फील होऊ लागेल. त्यासोबतच तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते

4/7

कमीत कमी किती मिनिटे कराव्या दोरी उड्या

Skipping For Weight Loss

फिटनेस तज्ञ दिवसातून किमान दररोज 20 ते 25 मिनिटे हा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. दररोज 20 ते 25 मिनिटे दोरी उडी मारल्याने अंदाजे 300 कॅलरीज बर्न करू शकते आणि आपला स्टॅमिना वाढू  शकते.

5/7

काय काळजी घ्यावी

Skipping For Weight Loss

दोरी उडी मारण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. रिकाम्या पोटी दोरी उड्या कधीही करू नका. त्यामुळे चक्कर येणे आणि पोटात अस्वस्थता येऊ शकते जेवण झाल्यावर दोरी उड्या खेळायच्या असतील तर 2-3 तास थांबा.

6/7

आधी करा वॉर्म-अप

Skipping For Weight Loss

दोरी उडीचा करण्याआधी थोडा वॉर्म-अप व्यायाम करणे आवश्यक आहे.

7/7

सगळ्यात सोपा उपाय आहे दोरी उडी

Skipping For Weight Loss

वजन कमी करण्यासाठी दोरी उड्या खेळणे हा एक प्रभावी आणि कमी वेळात होणारा पर्याय आहे. तुमच्या रोजच्या रुटिनमध्ये दोरी उड्यांना स्थान दिल्यासं तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)