दररोज 30 मिनिटे धावणे दीर्घायुष्यासाठी फायदेशीर, 'हॅप्पी हार्मोन्स'चा आरोग्यावर सकारात्मक परिणाम

सुदृढ आरोग्यासाठी धावणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. धावण्याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या बुधवारी साजरा केला जातो. यंदा तो 5 जून रोजी साजरा होत आहे. हा दिवस जगभरातील लोकांना धावण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याची संधी प्रदान करतो.

Jun 05, 2024, 10:52 AM IST

Global Running Day : सुदृढ आरोग्यासाठी धावणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. धावण्याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या बुधवारी साजरा केला जातो. यंदा तो 5 जून रोजी साजरा होत आहे. हा दिवस जगभरातील लोकांना धावण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याची संधी प्रदान करतो.

1/8

कधी झाली सुरुवात

ग्लोबल रनिंग डे 2016 मध्ये रनिंग फॉर फिटनेस नावाचा जागतिक उपक्रम म्हणून सुरू झाला. या उपक्रमाचे नेतृत्व तैवानमधील डॉ. तांग चिंग-हुई, एक प्रसिद्ध डॉक्टर आणि धावपटू यांनी केले.

2/8

अभ्यासात खुलासा

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, दररोज पाच ते दहा मिनिटे मध्यम धावणे देखील तुमचे आयुष्य वाढवू शकते. सर्व फिटनेस उपायांपैकी, धावणे सर्वात सोपा आहे. कोणताही पैसा खर्च न करता तुम्ही धावण्याच्या मदतीने आरोग्य निरोगी ठेवू शकते. विशेष म्हणजे 7-8 वर्षांच्या वयापासून ते 70-80 वर्षांपर्यंत धावणे शक्य आहे. तुम्ही धावून दर तासाला 700 ते 850 कॅलरीज बर्न करू शकता. वजन कमी करण्यापासून ते चांगल्या आरोग्यापर्यंत सर्वच बाबतीत ते फायदेशीर आहे.  

3/8

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

धावणे मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च अँड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार धावण्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. यामुळे मानसिक कणखरपणा येतो आणि तणाव कमी होतो. धावण्याचे शारीरिक आरोग्य फायदे तुम्ही अनेकदा वाचले आणि ऐकले असतील. याचा मोठा फायदा तुमच्या मानसिक आरोग्यासाठी होतो. धावताना शरीरात एंडॉर्फिन नावाचे हॅप्पी हार्मोन्स बाहेर पडतात.  त्यामुळे धावल्यानंतर वेगळाच आनंद जाणवेल. झपाट्याने बदलणाऱ्या या जगात ऑफिसपासून घरापर्यंतच्या प्रत्येक तणावाला तोंड देण्यासाठी धावणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे.

4/8

धावण्याने लैंगिक आरोग्य सुधारते

बदलत्या जीवनशैलीत नाती जपण्याचे मोठे दडपण असते. अनेक वेळा जोडप्यांमधील प्रेम हवे तसे नसते. यामुळे ते नाते तुटते. अशावेळी फक्त धावून त्यात सुधारणा करू शकता, तर ती एक अद्भुत कल्पना असेल. धावणे तुमचे लैंगिक आरोग्य अनेक प्रकारे सुधारते. "व्यायाम आणि प्रशिक्षणामुळे लैंगिक आरोग्यास निश्चितच फायदा होतो," इयान कर्नर म्हणतात, जे लोक दररोज धावतात त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असते.

5/8

धावण्यामुळे काम सुधारते

धावल्यामुळे लक्ष केंद्रीत होण्यास मदत होते. तसेच  कामात चांगल्या आणि नाविन्यपूर्ण कल्पना येण्यासाठी मदत होते. जेव्हा तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. तेव्हा तुम्हाला आपोआप काम करावेसे वाटेल. चांगल्या कल्पना निर्माण होण्यास आणि कामगिरी सुधारण्यास सुरुवात होईल.

6/8

धावल्याने पचनसंस्था सुधारते

धावल्याने शरीरातील सूक्ष्मजंतू निरोगी राहतात. त्यांचे आरोग्य चांगले राहिल्यास आपली प्रतिकारशक्ती आणि आरोग्यही चांगले राहील. याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेपासून ते रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत सर्व गोष्टींवर होतो. 

7/8

त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते

धावणे आपले शरीर आतून डिटॉक्स करते. आंघोळ केल्याने आपल्या शरीराच्या बाहेरची स्वच्छता होते. त्याचप्रमाणे धावणे आपल्या शरीराच्या आतील बाजूस स्वच्छ करते. हे त्वचा आणि केसांना सर्वात जास्त मदत करते.   त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी रक्ताभिसरण सर्वात जास्त जबाबदार असते. धावल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, म्हणजेच धावणे सुरू झाल्यावर तुमच्या केसांचे आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते.

8/8

डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते

नियमित धावणे तुमची इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी आपोआप कमी होते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो आणि असेही म्हटले जाते की, जास्त व्यायामामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो. यासाठी हळू धावणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. तुम्ही दररोज हळू धावून या समस्येचा सामना करू शकता.