परदेशातही होतंय संस्कृतीचं जतन, बेल्जियममध्ये महाराष्ट्रीयन गुढी

डिजिटल पाडवा उत्साहात साजरा  

Apr 13, 2021, 16:53 PM IST

गुढीपाडवा… हिंदुवर्षांनुसार महाराष्ट्रात गुढीपाडव्याला नवीन वर्ष उत्साहात साजरं केलं जातं. साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्यामुळे या सणाला खुप महत्व आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातील काही राज्यांमध्ये हा सण उत्साहात साजरा केला जातो. विविधतेनं नटलेल्या आपल्या संस्कृतीचं दर्शन देशातचं नाही तर परदेशातही पहायला मिळालं. दरवर्षीप्रमाणे यंदाही युरोपमधील बेल्जियम या देशात मराठी गुढ्या अभिमानाने उभारण्यात आल्या. भारतीय दुतावास आणि बेल्जियम मराठी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल पाडवा उपक्रमांतर्गत विविध संस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बेल्जियमचे भारतीय दुत संतोष झा आणि अभिनेत्री अदिती सारंगधर उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी होती.

1/5

नोकरी व्यवसायनिमित्त बेल्जियममध्ये अनेक नागरिक स्थायीक झाले आहे. आपली विविधतेनं नटलेली संस्कृती कुठेही असले तरी विसरता येत नाही. प्रत्येकजन जगाच्यापाठीवर संस्कृतीचं जतन करत असतो.  

2/5

बेल्जिमधील मराठी कुटुंबांनीही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारून आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन परदेशात घडवलं. बेल्जियमचे भारतीय दुत संतोष झा यांनी सर्व नागरीकांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदु नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच करोना संकटात डिजिटल पाडवा उपक्रमाचे कौतुक करून काळजी घेण्याचे आवाहन केलं.  

3/5

यावेळी नृत्यांगना आशू देवगुणे आणि शमिका सुताने यांनी नृत्य सादरीकरण केलं. प्रज्ञा चौलकर यांनी 'उंच माझा झोका' मालिकेच्या टायटल गीत गायलं. तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धे ३ ते ६  आणि ६ ते १२ वयोगटातील २९ बालचम्मुनी सहभाग नोंदवला.  

4/5

यामध्ये भारतीय वेशभूषा परिधान करून देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवलं. अनेकांनी आपल्या सादरीकरणातुन करोना महामारीची जनजागृती केली.  कोणी शिवरायांचे मावळे झाले,  कोणी श्रीकृष्ण साकारले तर कोणी सचिन तेंडूलकर होऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.  

5/5

यावेळी भारतातून परिक्षक म्हणून अभिनेत्री अदिती सारंगधर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अश्विनी टिपनीस यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बेल्जियम मराठी मंडळाच्या अध्यक्ष अनुश्री देशपांडे, रूपाली शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.