1 वर्षात Goldने किती दिला परतावा, उत्तर जाणून बसणार नाही विश्वास

.

Apr 01, 2021, 08:23 AM IST

मुंबई : 31 मार्च 2021 म्हणजे 2020-21 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरु होत आहे. जागतिक स्तरावर आणि सर्व देशभर कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic)गेल्यावर्षी व्यापाराच्या बाबतीत खूप सामान्य होते. बर्‍याच वर्षांनी मागील वर्ष चढउतारांनी भरलेले होते. असे असूनही, लोक सोने खरेदीला प्राधान्य देत होते. त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत राहिले, म्हणजेच सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय शोधत राहिले. दुसरीकडे, जर आपण मागील एका वर्षाच्या विचार करता सोने गुंतवणूक तिच राहिली आहे. मात्र, परतावा यावेळी कमी मिळाला आहे. सोन्याची चकम फिकी पडली. एका वर्षात Gold ने 0 परतावा दिलाय.

1/5

31 मार्च, 2021 अर्थात आर्थिक वर्ष 2020-21च्या शेवटच्या दिवशी सोन्यावरील परताव्याबद्दल बोलायचे झाले तर एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

2/5

2020-21 आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला, तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणूकीचे पर्याय शोधत होते, त्यानंतर आलेल्या आकडेवारीनुसार, सोने किंवा सोन्याच्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली गेली.

3/5

गेल्या एका वर्षाच्या अकाउंट बुककडे आपण पाहिले तर एक वर्षापूर्वीचे सोने तिथेच राहिले. म्हणजेच,  2019-20 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी, 31 मार्च 2020 रोजी, सोन्याचे दर 10  ग्रॅम, 43,335 रुपये होते, तर आर्थिक वर्ष 2020-21च्या शेवटच्या दिवशी 31 मार्च 2021 रोजी सोने होते. 44300 च्या आसपास दर कायम राहिले.

4/5

त्याचवेळी, 31 मार्च 2020 ते 31 मार्च 2021 दरम्यान सोने किंमतीची तुलना केल्यास, सोने आता 43300 रुपयांच्या आसपास आहे. तर तोच भाव कामय होता. सोने किंमत मागील वर्षांपूर्वीप्रमाणे होती. म्हणजेच 31 मार्च 2021 रोजी, जिथे एक वर्षापूर्वी सोन्याची किंमत निश्चित केली गेली होती, ती आता त्याच पातळीवर पोहोचली आहे.

5/5

2020-21 या आर्थिक वर्षात सोने दराने विक्रमी विक्रम नोंदविला. बाजाराच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2020 मध्ये एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. गेल्यावर्षी याचवेळी सोन्याने 43 टक्के परतावा दिला होता.