Asian Games 2023 : चौथ्या दिवशी नेमबाजीत भारतीय खेळाडूंची सुवर्ण कामगिरी; रौप्य पदकावरही कोरलं नाव

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चौथ्या दिवशी उत्तम कामगिरी करत अजून एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

| Sep 27, 2023, 11:56 AM IST
1/5

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चौथ्या दिवशी नेमबाजीत दमदार सुरुवात केली. 

2/5

मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी नेमबाजीमध्ये सुवर्णपदक पटकावलंय. 

3/5

चीनमधील हांगझोमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत त्यांनी ही सुवर्ण कामगिरी केली आहे. 

4/5

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 1759 गुण मिळवून गोल्ड मेडलवर कब्जा केलाय.

5/5

याचसोबत भारताच्या सिफ्ट कौर समरा, आशी चौकसे आणि मानिनी कौशिक यांनी 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक स्पर्धेत सिल्वर मेडलची कमाई केली.