Weekend Lockdown : राज्यात चांगला प्रतिसाद
.
मुंबई : राज्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकाने कडक निर्बंध लावताना शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन घोषित केला. या दोन दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील असे जाहीर करण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी लॉकडावूनला विरोध होत असताना अनेक जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन मात्र मनापासून स्वीकारलेला दिसत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर चिटपाखरूदेखील दिसत नाही. नेहमीची वर्दळीची गजबजणारी ठिकाणे शांत शांत आहेत.
1/8
राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आठवड्याच्या शेवटी बाहेर पडणारी गर्दी रोखण्यासाठी सरकारने वीकेंड लॉकडाउन लागू केला आहे. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट दिसत आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, रत्नागिरी या ठिकाणी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (सर्व छाया - प्रफुल्ल पवार, रायगड)
2/8
3/8
रायगडमध्ये शनिवार आणि रविवार या दोन दिवसांच्या लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद आहेत. तर किराणा माल , भाजीमार्केट , हॉटेल्सनाही टाळे लागले आहे. वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे. . ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असला तरी पोलिसांना फारसे काही काम उरलेले दिसत नाही. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांची चौकशी करूनच त्यांना पुढे सोडले जात आहे.
4/8
Weekend Lockdown : लॉकडाऊन म्हणजे काय असतो याचा अनुभव आज रायगडकर घेत आहेत .कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला रायगडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळत आहे . जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट आहे. (Weekend Lockdown: Strictly closed in Raigad district)
5/8
रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुरळक गर्दी विकएन्ड लॉकडाऊन हा नागरिकांनी गांभीर्याने घेतला असून त्याचा मोठा परिणाम रेल्वे सेवेवर झालेला पाहायला मिळत असून रोज होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. नेहमी गर्दीने गजबजणार्या रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांची आज तुरळक गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.फक्त अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या नागरिकांचा रेल्वे प्रवास सुरू आहे. (संग्रहित छाया)
6/8
विकेंड लॉकडाऊनला सांगलिकरांचा प्रतिसाद मिळत आहे. पोलीस रस्त्यावर नसताना देखील 100 टक्के कडकडीत बंद. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद : प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांसह व्यापाऱ्यांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद : सांगलीतल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट ; नागरिकांनीही कामाविना रस्त्यावर येणे टाळले.
7/8
नवी मुंबईत लॉकडऊन ला चांगलं प्रतिसाद मिळात आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता बाजारपेठा कडकडीत बंद आहेत,तर काही ठिकाणी भाजी मंडई देखील बंद ठेवण्यात आल्या असल्याने नागरिक देखील रस्त्यावर दिसत नाहीत , रस्त्यावर देखील तुरळक वाहने असून, पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त आहे. नवी मुंबईत30 ठिकाणी नाकाबंदी आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिकाना पोलीस सोडत आहे,
8/8