राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ही चांगली गोष्ट - शरद पवार

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी शरद पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी बोलताना राज्यपालांना परत पाठवण्यावर भाष्य केले.

Jan 28, 2023, 18:14 PM IST
1/5

bhagat singh koshyari statement

महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्यांवरुन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली असून त्यांना सातत्याने परत पाठवण्याची मागणी केली जात आहे. अशातच राज्यपाल राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला पदमुक्त व्हायचं आहे असं राज्यपालांनी ठरवलं आहे. 

2/5

bhagat singh koshyari PM modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली होती.

3/5

bhagat singh koshyari letter

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही, असे राज्यपालांनी म्हटले होते.

4/5

sharad pawar

त्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नवीन कोण राज्यपाल येणार हे माहीत नाही. मात्र आताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ही चांगली गोष्ट आहे, असे शरद पवार म्हणाले.

5/5

Uddhav Thackeray

दरम्यान, आपल्या वक्तव्यांनी अडचणीत आल्यानंतर राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती. उद्धव ठाकरे, अजित पवार यासह अनेकांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यपालांनी स्वतः राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.