Atharva Sudame Married: अस्सल पुणेकर Social Media Influencer अडकला विवाहबंधनात! बेस्ट फ्रेण्डबरोबर केलं लग्न

Atharva Sudame Got Married: विनोदी विषय, सामाजिक संदेश देणारे विषय आणि माहितीपर रिल्समधून तो लोकांचं मनोरंजन करत असतो. त्याला न ओळखणाऱ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

Jan 28, 2023, 18:07 PM IST
1/8

Atharva Sudame Got Married

सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय पुणेकर (Pune) अशी ओळख निर्माण करणारा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर (social media infulenser) नुकताच विवाह बंधनात अडकला आहे.

2/8

Atharva Sudame Got Married

या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरचं नाव आहे अथर्व सुदामे (atharva sudame) आता अथर्व सुदामेला न ओळखणाऱ्या मराठी नेटकऱ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असेल असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही इतका तो लोकप्रिय आहे. 

3/8

Atharva Sudame Got Married

प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2023 रोजी अथर्व लग्न बंधनात अडकला. त्याने त्याची पुण्यातील मैत्रीण रुचा जोशीबरोबर लग्न केलं आहे. 

4/8

Atharva Sudame Got Married

मिसेस सुदामे अशा कॅप्शनसहीत अथर्वनेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लग्नातील तीन फोटो पोस्ट केले आहेत. यापैकी एका फोटोत दोघे एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत.

5/8

Atharva Sudame Got Married

अन्य एका फोटोत अथर्व आणि रुचा दोघे सप्तपदी घेताना दिसत आहेत.

6/8

Atharva Sudame Got Married

तर तिसऱ्या फोटोमध्ये हे दोघे मिठी मारताना दिसत आहेत.

7/8

Atharva Sudame Got Married

अथर्वला अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छाही दिल्या आहेत. यामध्ये सुयश टिळक, पुष्कर जोग, मेघना एरंडे यासारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

8/8

Atharva Sudame Got Married

अथर्वचे इन्स्टाग्रामवर 4 लाख 79 हजार फॉलोअर्स आहेत. विनोदी विषय, सामाजिक संदेश देणारे विषय आणि माहितीपर रिल्समधून तो लोकांचं मनोरंजन करत असतो. हल्ली अनेक मराठी सेलिब्रिटी आपल्या चित्रपटांच्या डिजीटल प्रमोशनसाठी अथर्वबरोबर त्याच्या रिलमध्ये दिसून येतात हे विशेष.