रिव्हर्स करताना कार इतक्या वेगाने नेली की झाला विश्वविक्रम! गिनीज बुकात नोंद

परदेशात एका कारचालकाने एक सुपरकार उलटी चालवून चक्क विश्वविक्रम केला आहे. हा विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला आहे. पण अशी कामगिरी करणारी गाडी नक्की आहे तरी कोणती आणि ती कोणी चालवली हा प्रश्न सगळ्यानांच पडलाय.

Nov 09, 2023, 17:46 PM IST
1/6

कोणी केलाय हा पराक्रम?

Rimac Nevera 7

जर्मनीतील पापेनबर्ग येथील ऑटोमोटिव्ह टेस्टिंग सेंटरमध्ये Rimac Nevera ही इलेक्ट्रिक हायपरकार  रिव्हर्स चालवण्यात आली. गोरान ड्रंडकने रिव्हर्समध्ये 275.74 किमी प्रतितास वेगाने उलटी कार जुना विक्रम मोडला.

2/6

गिनीज बुकात नोंद

Rimac Nevera 6

रिव्हर्स ड्रायव्हिंगद्वारे जगातील सर्वात वेगवान कार इलेक्ट्रिक हायपर कार बनली आहे. यासह, रिव्हर्स ड्रायव्हिंगचा हा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदवला गेला आहे. 

3/6

कुठे झाला हा विक्रम?

Rimac Nevera 5

हा विक्रम मंगळवारी क्रोएशियाच्या गोरान ड्रंडक जर्मनीच्या ऑटोमोटिव्ह टेस्टिंग पापेनबर्ग सेंटरमध्ये करण्यात आला.

4/6

मोडला जुना विक्रम

Rimac Nevera 3

हा विक्रम करणाऱ्या गोरान ड्रंडकने 22 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. यापूर्वी 2001 मध्ये 165.08 किमी प्रतितास वेगाने कार रिव्हर्स चालवून विक्रम केला होता.

5/6

जगातील वेगवान कार

Rimac Nevera2

Rimac Nevera ही Rimac Automobili द्वारे बनवलेली इलेक्ट्रिक हायपरकार आहे. या कारमध्ये चारही चाकांना उर्जा देण्यासाठी मोटर बसवण्यात आली आहे. फ्लायव्हीलच्या चार मोटर्स मिळून 1,914 एचपी पॉवर निर्माण करतात. 

6/6

कशी आहे ही सुपरकार?

Rimac Nevera1

कारच्या आत एक Nvidia सुपर कॉम्प्युटर आहे जो सर्व चाकांना प्रति सेकंद अंदाजे 100 वेळा पाठवलेल्या टॉर्कची मोजणी करतो. या फीचरच्या मदतीने कार रिव्हर्समध्ये धावण्यास मदत होते. याची किंमत भारतीय रुपयांमध्ये सुमारे 17.84 कोटी आहे.