close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

तो आला रेsss! अखेर OnePlus 7 Pro ग्राहकांच्या भेटीला

May 15, 2019, 07:45 AM IST
1/6

जाणून घ्या या फोनची काही अफलातून वैशिष्ट्ये

OnePlus या स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून मंगळवारी OnePlus 7 सीरिजमधील मोबाईल फोन लाँच करण्यात आले. ज्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली ती या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित फोनची. भारतीय बाजारपेठेत OnePlus या फोनला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच हैदराबाद येथे सर्वात मोठ्या एक्स्पिरिअन्स सेंटर उभारण्याची महत्त्वाची घोषणाही या कंपनीकडून करण्यात आली. (छाया सौजन्य - OnePlus / Twitter)

2/6

जाणून घ्या या फोनची काही अफलातून वैशिष्ट्ये

'अॅपल' आणि 'सॅमसंग' या लोकप्रिय ब्रँडला टक्कर देत OnePlus ने बाजारपेठेत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ज्यामध्ये आता एका नव्या सीरिजची भर पडली आहे. OnePlus 7  आणि OnePlus 7 प्रो असे ३२ हजार ९९९ रुपये किंमतीच्या पुढील दराचे फोन या कंपनीकडून बाजारपेठेत आणण्यास आले आहेत. (छाया सौजन्य - OnePlus / Twitter)

3/6

जाणून घ्या या फोनची काही अफलातून वैशिष्ट्ये

OnePlus 7 ची किंमत ही ३२, ९९९ रुपयांच्या घरात असेल. या फोनला ३२, ९९९ रुपये या दरात 6GB RAM आणि ३७, ९९९ या दरात 8GB RAM देण्यात आला आहे. (छाया सौजन्य - OnePlus / Twitter)

4/6

जाणून घ्या या फोनची काही अफलातून वैशिष्ट्ये

'गो बियॉण्ड द स्पीड' अशा टॅगलाईनसह OnePlus 7 Pro लाँच करण्यात आल्यानंतर या फोनचे फिचर्स ही टॅगलाईन सार्थ ठरवत असल्याचं स्पष्ट होत आहे. (छाया सौजन्य - OnePlus / Twitter)

5/6

जाणून घ्या या फोनची काही अफलातून वैशिष्ट्ये

OnePlus 7 Pro हा 6GB, 8GB आणि 12GB RAM मध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत ४८, ९९९ ते ५७, ९९९ रुपये इतकी आहे. OnePlus 7 Proला ६.६७ इंच इतका डिसप्ले देण्यात आला आहे. ज्याला जोड आहे ती म्हणजे ट्रीपल लेन्स रिअर कॅमेराची.  (48MP+16MP+8MP) अशा प्रमाणांमध्ये या कॅमेऱ्याच्या माध्यामातून काही अद्वितीय क्षण टीपता येणार आहेत. या फोनला  4,000 mAh इतकी बॅटरी देण्यात आली आहे.  (छाया सौजन्य - OnePlus / Twitter)

6/6

जाणून घ्या या फोनची काही अफलातून वैशिष्ट्ये

Haptic vibration motor असणाऱ्या OnePlus 7 Proला ड्युअल स्टिरिओ स्पीकर देण्यात आले असून, डॉल्बीच्या सहाय्याने ग्राहकांना अद्वितीय श्रवणीय अनुभव घेता येणार आहे. (छाया सौजन्य - OnePlus / Twitter)