ग्वाटेमालात ज्वालामुखीचा उद्रेक, शेकडो नागरिकांचा मृत्यू तर १७ लाख प्रभावित

Jun 09, 2018, 08:43 AM IST
1/5

ग्वाटेमालामधील फ्युगो ज्वालामुखीचा उद्रेक झाला. तीन जून रोजी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मृतकांची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी (८ जून) रोजी मृतकांचा आकडा वाढून १०९वर पोहोचला आहे.

2/5

ग्वाटेमालातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ता डेविड डी लियोन यांनी गुरुवारी (७ जून) सकाळी सांगितलं की, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, हवामान खराब असल्यामुळे अनेक अडथळे येत आहेत.

3/5

यापूर्वी गुरुवारी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॉरेंसिक सायन्स (आयएनएसीआयएफ)ने आणखीन दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृतकांमध्ये एक आठ वर्षांचा मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ २८ मृतकांची ओळख पटली आहे.

4/5

मिळालेल्या माहितीनुसार, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आतापर्यंत १७ लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. १२,४०७ नागरिकांचं सुखरूप स्थलांतर करण्यात आलं आहे. तर, ७,३९३ नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (फोटो सौजन्य: IANS)

5/5

आपत्ती व्यवस्थापन कोनरेडने सांगितलं की, खराब हवामानामुळे आणि ज्वालामुखीचा उद्रेक सुरु असल्यामुळे मदतकार्यात अडथळा येत आहे. ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ७२ तासांहून अधिक वेळ झाला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर गरम दगड, राख आणि ढिगाऱ्यामुळे अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (फोटो सौजन्य: Reuters)