ऋतिक रोशनचा आज 44 वा वाढदिवस आहे. उत्तम अभिनेत्यासोबत तो एक डान्सरही आहे. 2000साली सुजैन खानसोबत ऋतिक विवाहबद्ध झाला. त्यानंतर त्यांंच्या आयुष्यात रिहान आणि रिधान यांंचं आगमन झालं.
2/8
ऋतिक आणि सुजैन ही बॉलिवूडची आदर्श जोडी होती. मात्र 2013 साली ते एकमेकांपासून दूर झाले. पुढील वर्षभरात त्यांनी घटस्फोट घेतला.
TRENDING NOW
photos
3/8
ऋतिक मुलांसोबत अनेकदा 'क्वॉलिटी टाईम' घालवतो. सोशल मीडियावरही तो मुलांसोबतचे फोटो शेअर करतो. सुजैन आणि मुलांंसोबत अनेकदा तो डिनरसाठी बाहेर जातो.
4/8
घटस्फ़ोटानंतरही सुजैन आणि ऋतिक मुलांंसाठी एकत्र येतात. सहलीला जातात. ऋतिक अनेकदा काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखताना दिसला आहे.
5/8
ऋतिक आणि कंगणा रणावतच्या वादानंतर ऋतिकचे कुटुंब आणि एक्स पत्नी सुजैनही पाठीशी उभी होती.
6/8
ऋतिकच्या करियरची सुरूवात 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून झाली. राकेश रोशन दिग्दर्शित या चित्रपटाने त्याचा यशस्वी डेब्यू झाला.
7/8
लवकरच ऋतिक 'सुपर 30' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
8/8
ऋतिकचा आगामी चित्रपट आनंद कुमारांच्या जीवनावर आधारित आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link