अशोक मामांच्या मानलेल्या मुलीचा वाढदिवस

कोण आहे अशोक मामांची मानलेली मुलगी?   

Jan 31, 2020, 13:26 PM IST

मुंबई : 'काहे दिया परदेस' मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेल्या सायली संजीवचा आज वाढदिवस आहे. सायली संजीव बद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अभिनेते  अशोक सराफ यांची मानलेली मुलगी आहे, अनेकांना जरी ही अफवा वाटत असली तरी हे सत्य असल्याचं संजीवनी म्हणते. 'अशोक सराफ मला त्यांची मुलगी मानतात तर मी त्यांची मानलेली मुलगी आहे हे बऱ्याचं लोकांना माहीत नाही.' असं वक्तव्य तिने एका मुलाखतीत केलं होतं. 

1/5

सायली संजीव

 सायली संजीव

संजीवने आतापर्यंत 'पोलिस लाईन, 'आटपाटी नाईट्स' 'सातारचा सलमान' या चित्रपटांमध्ये झळकली होती. आता लवकरच ती नवीन चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 

2/5

सायली संजीव

 सायली संजीव

'मन फकिरा' या चित्रपटाच्या माध्यमातून ती पुन्हा मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. हा तिचा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. 

3/5

सायली संजीव

 सायली संजीव

सुव्रत जोशी आणि सायली संजीव ही नवी जोडी 'मन फकिरा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

4/5

सायली संजीव

 सायली संजीव

'मन फकिरा’ हा ट्रेंड सेटिंग चित्रपट असून तो नातेसंबंधांवर भाष्य करतो आणि आजची युवा पिढी विशेषतः लग्न या नात्याकडे फक्त बंधन म्हणून न बघता त्याच्यापलीकडे जगायला शिकली आहे. असं या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

5/5

सायली संजीव

 सायली संजीव

या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.