बर्थडे स्पेशल : ८ वर्षात ६ सुपरहिट सिनेमे देणारा हिरो...

Apr 24, 2018, 16:12 PM IST
1/5

Varun Dhawan, Happy Birthday

Varun Dhawan, Happy Birthday

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा आज ३१ वा वाढदिवस आहे. २०१० मध्ये वरुणने आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. करण जोहरच्या स्टुडेंट ऑफ द ईअर या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. त्याचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आणि तो प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. त्यानंतर वरुण धवनने सुपरहिट सिनेमांची रांगच लावली.

2/5

Varun Dhawan, Happy Birthday

Varun Dhawan, Happy Birthday

८ वर्षांच्या करिअरमध्ये वरुणने ११ सिनेमांमध्ये काम केले. आतापर्यंत त्याचा एक सिनेमा फ्लॉप झाला नाही. उलट ११ पैकी ६ सिनेमे सुपरहिट ठरले.  

3/5

Varun Dhawan, Happy Birthday

Varun Dhawan, Happy Birthday

इतकंच नाही तर वरुणचा मेणाचा पुतळा हॉन्ग कॉन्गच्या मॅडम तुसादमध्ये बनवण्यात आला आहे. त्यानंतर मॅडम तुसादमध्ये पुतळा असणारा तो सर्वात तरुण स्टार झाला. वरुण धवनच्या फॅन फॉलोलिंगबद्दल तर बोलायलाच नको.   

4/5

Varun Dhawan, Happy Birthday

Varun Dhawan, Happy Birthday

अलिकडेच वरुणचा अक्टूबर हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात वरुणच्या अभिनयाचे खूप कौतूक करण्यात आले. लवकरच तो अनुष्का शर्मासोबत सुई धागा आणि रोमोच्या डान्स सिनेमात झळकेल.  

5/5

Varun Dhawan, Happy Birthday

Varun Dhawan, Happy Birthday

त्याच्या सिनेमांना मिळणारा प्रतिसाद आणि त्याचे फॅन फॉलोविंग पाहता त्याने ८ वर्षात सिनेसृष्टीत आपले चांगलेच बस्तान बसवले आहे आणि आपली खास ओळखही निर्माण केली. वरुणला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. (फोटो सौजन्य- @varundvn/ Instagram)