घटस्फोटाची चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्या दिसला 'या' मिस्ट्री गर्लसोबत; नेटकरी म्हणाले 'भाभी मिळाली'

Hardik Pandya With Mistry Girl: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Padnya) आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या घटस्फोटाच्या चर्चेत आहेत.

Jul 12, 2024, 11:17 AM IST
1/5

हार्दिक पांड्या

नताशाने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हार्दिकशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या अन् त्यानंतर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली होती. अशातच आता हार्दिक पांड्याचा एक फोटो समोर आलाय.

2/5

तरुणी कोण ?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हार्दिक पांड्या एका तरुणीसोबत दिसतोय. ही तरुणी नेमकी कोण आहे? यावर चर्चेला उधाण आलंय. 

3/5

प्राची सोलंकी

हार्दिक पांड्यासोबत सोशल मीडियावर फोटो केलेल्या तरुणीचं नाव प्राची सोलंकी आहे. प्राची सोलंकी ही प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिने नुकतेच हार्दिकसोबत फोटो शेअर केला.

4/5

कृणाल पांड्यासोबत देखील फोटो

प्राची सोलंकीने फक्त हार्दिकच नाही तर कृणाल पांड्यासोबत देखील फोटो पोस्ट केलाय. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पांड्या कुटूंबियांचे आणि प्राचीचे चांगले संबंध असल्याचं दिसतंय.

5/5

नवी भाभी मिळाली

दरम्यान, सोशल मीडियावर प्राचीची फॅन फॉलोविंग देखील चांगली आहे. पांड्यासोबत पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी प्राचीच्या फोटोवर कमेंट्स केल्यात. नवी भाभी मिळाली, असं अनेकांनी कमेंट करून म्हटलंय.