कर्करोग आणि मधुमेह पासून दूर रहायचय... डाएट मध्ये हा पदार्थ सुरु करा

रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असल्यास आहारात ही हिरवी भाजी नक्कीच खावी . या भाजीत  मधुमेह नष्ट करण्याची शक्ती आहे आणि कर्करोगापासूनही संरक्षण मिळतं. ही भाजी पालकपेक्षा जास्त पोषण देते, त्यामुळे या भाजीचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. 

Jan 04, 2024, 18:52 PM IST

रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असल्यास आहारात ही हिरवी भाजी नक्कीच खावी . या भाजीत  मधुमेह नष्ट करण्याची शक्ती आहे आणि कर्करोगापासूनही संरक्षण मिळतं. ही भाजी पालकपेक्षा जास्त पोषण देते, त्यामुळे या भाजीचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. 

1/8

पालक

पालक ही  खूप शक्तिशाली आणि पौष्टिक भाजी आहे असं म्हटलं जातं, पण एक भाजी यापेक्षाही आरोग्यदायी आहे. त्यात कॅन्सर नष्ट करण्याची ताकदही आहे, पण या गुणकारी भाजीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. काही लोकांना वाटतं की ही फक्त एक प्रकारची कोबी आहे परंतु ही भाजी त्यापेक्षा जास्त आरोग्यदायी आहे.  

2/8

ब्रोकोली

ब्रोकोलीत अनेक जीवनसत्त्वे, खनिजे,अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचं प्रमाण जास्त  आहे. हे खाल्ल्यानं शरिराला  सूज कमी येते, आणि प्रतिकारशक्तीही वाढते. ब्रोकोली अनेक रोगांवर उपायकारक आहे, म्हणून तीचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे. 

3/8

कॅन्सर

ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, गॅस्ट्रिक कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर, किडनी कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर इत्यादींना घाबरण्याची गरज नाही. ब्रोकोलीमध्ये इतर कोणत्याही क्रूसीफेरस भाज्यांपेक्षा जास्त विटॅमिन  असतं ज्यामुळे  पेशींचं नुकसान होत नाही. 

4/8

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

रक्तातील साखरेचं व्यवस्थापन करण्यासाठी फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सची आवश्यकता असते. त्यामुळे ब्रोकोली मधुमेहाच्या रुग्णांसाठी जीवनरक्षकासारखं काम करते. फायबरमुळे  ग्लुकोज रक्तामध्ये हळूहळू सोडलं जातं आणि अँटिऑक्सिडंट्समुळे होणारे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.  

5/8

अल्कोहोल, हाय कोलेस्टेरॉल, चरबी आणि ट्रायग्लिसराइड्समुळे शिरा बंद होतात. अशा परिस्थितीत, हृदयाला अधिक शक्तीने पंप करावा लागतो आणि वेळेनुसार दबाव वाढतो. या सर्व धोक्यांपासून संरक्षण करण्याची क्षमता ब्रोकोलीमध्ये आहे.

6/8

हे अन्न पचन आणि पोटातील जीवाणूंसाठी आरोग्यदायी आहे. यामुळे अन्नाचे पचन सोपे होते आणि पोटाच्या समस्यांचा धोका कमी होतो. निरोगी जीवाणूंच्या वाढीमुळे, आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि दररोजचा कचरा सहज काढला जातो.

7/8

संतुलित आहार

तुम्हाला हे जाणून आश्‍चर्य वाटेल की त्यात पालकापेक्षाही जास्त पोषकतत्व असतात. याशिवाय, त्यात प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते. मात्र, प्रत्येक भाजीचे स्वतःचे महत्त्व असते, त्यामुळे सर्वांनी मिळून संतुलित आहार घेतला पाहिजे.  

8/8

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)