Over Eating: अतिभूक लागणं तुमच्यासाठी धोक्याचं! वेळीच ओळखा 'ही' लक्षणं, फॉलो करा 'या' स्टेप्स...
भुक लागणं हे काही गैर नाही परंतु सारखी सारखी भूक लागणं हे अनारोग्यचं लक्षण ठरू शकतं तेव्हा अतिभूक लागणं कसं टाळावे यासाठीचे हे सोप्पे उपाय वेळीच जाणून घ्या.
आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात स्ट्रेसचं प्रमाणही वाढते जाते आहे. त्यामुळे अनेकदा आपल्याला जास्त भूकही लागू शकते आणि जास्त भूक लागणे आणि मग त्यापद्धतीनं भरपूर खाणं हे तुमच्यासाठी घातकही असू शकते. तेव्हा अशावेळी आपल्या भूकेला कंट्रोल करणंही महत्त्वाचे आहे. तेव्हा जाणून घेऊया की नक्की तुम्ही कोणत्या गोष्टी अशावेळी अवलंबवू शकता.