Benefits Basmati Rice : बासमती तांदळाचे 7 आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Benefits Basmati Rice : आपण काही स्पेशल असलं की घरात बासमती तांदूळाचे पदार्थ बनवतो. पण तुम्हाला माहिती आहे कार्बोहाइड्रेटचा उत्तम स्त्रोत असणारे बासमती तांदळाचे आपल्या आरोग्यास अनेक फायदे आहेत. 

Jul 24, 2023, 10:02 AM IST

Basmati Rice Health Benefits : बासमती तांदूळ हा एक अतिशय लोकप्रिय असा तांदूळ आहे. जिरा राईस, बिर्याणी, पुलाव या खास पदार्थ्यांसाठी आपण बासमती तांदूळाचा उपयोग करतो.

1/9

पण या बासमती तांदूळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

2/9

बासमती तांदूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतात. बासमती तांदळात ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

3/9

बासमती तांदळात फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठता सारख्या पचनाच्या समस्येपासून मुक्तता मिळते. 

4/9

बासमती तांदळात ब जीवनसत्त्वं मुबलक प्रमाणात असल्याने ते आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

5/9

बासमती तांदूळ वजन कमी करण्यासही खूप फायदेशीर आहे. यातील फायबरमुळे तुम्हाला भूक लागत नाही. 

6/9

बासमती तांदळात लोह, जस्त, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि तांबं यांसारख्या खनिजे असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. 

7/9

बासमती तांदळात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमही भरपूर आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

8/9

बासमती तांदूळ हा हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. ते कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास उपयुक्त आहे. 

9/9

बासमती तांदळात कर्करोग आणि अकाली मृत्यूचा धोका कमी करणारे गुणधर्म असल्याने आहारतज्ज्ञ या तांदळाचा आहारत समावेश करण्याचा सल्ला देतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)