ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायचं आहे का? 'हे' 5 पदार्थ जेवणात समाविष्ट करा

High Blood Sugar: वाढत्या वयासह डायबेटिजचा (diabetes) त्रासही होऊ लागतो. दरम्यान, जर तुम्हालाही डायबेटिजची समस्या असेल तर असे अनेक पदार्थ आहे जे तुम्ही तुमच्या जेवणात समाविष्ट करु शकतात. या पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) कमी करण्यास मदत मिळते.   

Jul 20, 2023, 17:23 PM IST
1/12

Diabetes Diet: वाढत्या वयासह डायबेटिजचा (diabetes) त्रासही होऊ लागतो. तसंच डायबेटिजमुळे आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. जर डायबेटिजचा त्रास असेल तर आपल्या खाण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. जर तुमचा डाएट योग्य नसेल तर ब्लड शुगर गरजेपेक्षा जास्त वाढवण्याची किंवा कमी होण्याचा धोका असतो. तसंच तुमच्या आहारात काही गडबड झाली तर ब्लड शुगरमध्ये वाढ होण्याची भीती असते.   

2/12

अशा स्थितीत डायबेटिजचे रुग्ण काय खातात याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे ब्लड शुगरला नियंत्रित ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यायचा हे जाणून घ्या.   

3/12

दालचिनी

डायबेटिजच्या रुग्णांमधील बॉडी मास इंडेक्स कमी करण्यात दालचिनी प्रभावी आहे.   

4/12

दालचिनीत अनेक पोषकतत्वं असतात, ज्यामुळे तुम्ही त्याला आपल्या जेवणात सहभागी करुन घेऊ शकता. दालचिनीचं सेवन ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यातही योगदान देतं.   

5/12

दही

ब्लड शुगर लेव्हल वाढण्यापासून रोखायचं असेल, तर दहीचं सेवन केलं जाऊ शकतं.   

6/12

दहीत  प्रोबायोटिक्स असतात आणि हाय ब्लड शुगर कमी करण्यावर प्रभावी असतं. तुम्ही दही असंच खाऊ शकता किंवा त्यापासून इतर गोष्टी करतही सेवन करु शकता.   

7/12

भेंडी

भेंडी फ्लेव्होनॉइड्सचा चांगला स्रोत आहे. फ्लेव्होनॉइड्स हे अँटिऑक्सिडंट्स आहेत जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी दर्शविले गेले आहेत.   

8/12

भेंडीमध्ये अशी अनेक पोषकं आहेत जी रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात.  

9/12

बिया

बियाणांना निरोगी पदार्थांच्या यादीत स्थान आहे. भोपळ्याच्या बिया, जवसच्या बिया आणि चिया सीड्स यांच्यात भरपूर पोषक असतात. यातून शरीराला भरपूर पोषण मिळते.   

10/12

निरोगी राहण्यासाठी बियांचा आहाराचा भाग बनवता येतो.  

11/12

संपूर्ण धान्य

फायबरचे सेवन मधुमेहामध्ये फायदेशीर आहे. हाय ब्लड शुगर कमी करण्यासाठी फायबर प्रभावी आहे. 

12/12

संपूर्ण धान्यामध्ये भरपूर फायबर आढळते. या कारणास्तव ओट्स, गहू आणि क्विनोआ सारख्या संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. ते शिजवणे देखील सोपे आहे आणि ते आरोग्य देखील चांगले ठेवतात.