नेटफ्लिक्सचा युजर्सना मोठा धक्का; आता शेअर करता येणार नाही लॉगिन-पासवर्ड

ओटीटी प्लॅटफॉर्म 'नेटफ्लिक्स'ने भारतीय युजर्संना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने 20 जुलैपासून भारतातील पासवर्ड शेअरिंग सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या वतीने युजर्सना मेल पाठवून ही माहिती देण्यात आली आहे. महसुलावर होणारा परिणाम लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, यूजर्स त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह पासवर्ड शेअर करू शकतात, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Jul 20, 2023, 17:18 PM IST
1/8

पासवर्ड शेअरिंगवर बंदी

netflix password sharing india

काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंग फीचर लागू केले होते. ज्यामध्ये पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालण्यात आली होती. हे फिचर आजपासून भारतात लागू केले जात आहे. त्यामुळे, आजपासून नेटफ्लिक्स युजर्स त्यांच्या घराबाहेरील लोकांसोबत नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर करू शकणार नाहीत. या रोलआउटसह, कंपनीने अनेक नियम आणि अटी जोडल्या आहेत.

2/8

20 जुलैपासून नियम लागू

netflix password sharing

नेटफ्लिक्स अनेक दिवसांपासून पासवर्ड शेअरिंगला विरोध करत होती. कंपनीने अनेक भागांमध्ये पासवर्ड शेअर करणे बंद केले होते आणि त्यावर शुल्क आकारले होते. त्यामुळे जर तुम्ही पासवर्ड शेअर केला असेल तर तुम्हाला त्यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागेल. 20 जुलैपासून कंपनीने भारतातील ग्राहकांनासाठी हा नियम लागू केला आहे.  

3/8

100 हून अधिक देशांमध्ये निर्बंध लागू

netflix passoword ban

त्यामुळे आता भारतातील नेटफ्लिक्स युजर्स यापुढे पासवर्ड शेअर करू शकणार नाहीत. कंपनीने पासवर्ड शेअरिंगला महसूल बुडण्याचे कारण मानले आहे. 2023 च्या सुरुवातीला कंपनीने हे पाऊल अमेरिकेतही उचलले होते. यानंतर, कंपनीने मे महिन्यात ही पॉलिसी 100 हून अधिक देशांमध्ये राबवली आहे.

4/8

नेटफ्लिक्सने केली घोषणा

netflix announcement

"नेटफ्लिक्स अकाऊंट हे एका कुटुंबासाठी असते. घरातील प्रत्येकजण नेटफ्लिक्स वापरू शकतो. तुम्ही घराबाहेर किंवा सुट्टीवर असता तेव्हा तुम्ही प्रोफाइल ट्रान्सफर करणे आणि मॅनेज एक्सेस अॅण्ड डिव्हाइसेस यासारख्या नवीन फिचरचा लाभ घेऊ शकता. आमच्या युजरची मनोरंजनाची विविध प्राधान्ये आहेत, म्हणूनच आम्ही विविध नवीन चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत," असे नेटफ्लिक्सने म्हटलं आहे.

5/8

ट्रान्सफर प्रोफाइलचा पर्याय वापरावा लागणार

transfer profile netflix

त्यामुळे आता जर नेटफ्लिक्स युजरला त्याचा पासवर्ड बाहेरच्या व्यक्तीसोबत शेअर करायचा असेल तर त्याला ट्रान्सफर प्रोफाइल पर्याय वापरावा लागेल. असे केल्यावर, युजरकडून निश्चित रक्कम वसूल केली जाईल. 

6/8

भरावे लागणार पैसे

Netflix money

'बाय फॉर एक्स्ट्रा मेंबर' असे या पर्यायाचे नाव आहे. याद्वारे युजर त्यांच्या नेटफ्लिक्स अकाऊंटचा पासवर्ड त्यांच्यासोबत राहत नसलेल्या व्यक्तीला देऊ शकतात. त्यासाठी पैसे भरावे लागतील.

7/8

युजर्सना येणार ईमेल

Netflix email

भारतात नेटफ्लिक्स वापरणाऱ्या लोकांना सुरुवातीला ईमेल मिळेल. यामध्ये युजर्सना अकाउंटच्या वापराबाबत काही स्टेप्सची माहिती दिली जाईल. नेटफ्लिक्सने गुरुवारी 20 जुलै रोजी सकाळी नवीन निर्बंधाची माहिती दिली आहे. अपडेटनुसार, नेटफ्लिक्स सुरुवातीला एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर एकच अकाऊंट वापरणाऱ्या युजर्सना ईमेल पाठवेल.

8/8

कसं थांबवणार Netflix?

Netflix Ban

युजर्संना रोखण्यासाठी नेटफ्लिक्स अनेक प्रकारचे निर्बंध लादू शकते. यामुळे, युजर्संना एकच अकाऊंट वेगवेगळ्या डिव्हाइसवर वापरणे कठीण होईल. यासाठी कंपनी व्हेरिफिकेशन कोड आणि  वाय-फाय अॅक्सेस यांसारखी अनेक फिचर जोडू शकते. (सर्व फोटो - Reuters)