एका आठवड्यात नियंत्रणात येईल कोलेस्ट्रॉल, सकाळी करा 'ही' 6 योगासने

कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Increased Problem) वाढल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्टअटॅर आणि ह्रदयाचे इतर आजार होतात.

| Oct 06, 2023, 18:40 PM IST

High Cholesterol Yogasan: कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Increased Problem) वाढल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्टअटॅर आणि ह्रदयाचे इतर आजार होतात.

1/7

एका आठवड्यात नियंत्रणात येईल कोलेस्ट्रॉल, सकाळी करा 'ही' 6 योगासने

 health tips in marathi 6 Yoga Poses For Cholesterol Control

शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरते. कोलेस्ट्रॉलमुळं हृदयविकाराचा धोका संभवतो. साधारणपणे 20 वयानंतर लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास सुरुवात होते. योगासने करुनही तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकता. 

2/7

ताडासन

health tips in marathi 6 Yoga Poses For Cholesterol Control

ताडासन आसन तुम्ही दिवसभरातून कधीही करु शकता. दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून किंवा दोन्ही पायांमध्ये थोडेस अंतर ठेवून उभे राहा. श्वासोच्छास सुरू करत दोन्ही हात हळहळू वरच्या बाजूस न्यावेत. आता पायांच्या टाचा वर उचला आणि पायांच्या बोटांवर उभे राहून शरीराचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. ताडासन करताना हात आणि पाय कधीही वाकवू नयेत ताडासनामुळं शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

3/7

ट्री पोज

health tips in marathi 6 Yoga Poses For Cholesterol Control

वृक्षासन हाय कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर याने शरीराचे संतुलन राखण्यास मदत होते. 

4/7

वीरभद्रासन

health tips in marathi 6 Yoga Poses For Cholesterol Control

हाय कोलेस्ट्रॉल शरीरातून काढून टाकण्यासाठी वीरभद्रासन ही बेस्ट योगासन आहे. यामुळं शरीराची लवचिकतादेखील वाढते.

5/7

पश्चिमोत्तासन

health tips in marathi 6 Yoga Poses For Cholesterol Control

योगा करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पश्चिमोत्तासन पाचनसंस्था सुधारुन मेटाबॉलिजम सुधारते. कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करण्यास मदत होते. 

6/7

सेतूबंध आसन

health tips in marathi 6 Yoga Poses For Cholesterol Control

कोलेस्ट्रॉलसंबंधी सर्व समस्या ठीक करण्यासाठी नियमीत हे आसन करा. पाचनतंत्र सुरळीत करण्याबरोबरच पोटाची चरबी घटवण्यासाठीही फायदेशीर आहे. 

7/7

हलासन

health tips in marathi 6 Yoga Poses For Cholesterol Control

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी हलासन एक खूप चांगले आसन आहे. या आसनामुळं शरीरात रक्तप्रवाहव सुरळीत होतो. तणाव कमी होतो आणि हृदय आणि मेंदू यांच्यातील संतुलन राखण्यास मदत होते.